आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत वैजापूर न्यायालयातर्फे फेरी

वैजापूर ,२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वैजापूर न्यायालयात “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करण्यात आला. यानिमित्ताने न्यायाधीश व वकिलांनी शहरातून फेरी काढून सदभावनेचा संदेश दिला. नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथरीटी यांच्यामार्फत सूचित केलेल्या लीगल अक्सेस ऑफ प्रोग्रॅमच्या अनुषंगाने ही फेरी काढण्यात आली होती.

आझादी का अमृत महोत्सव हा उपक्रम 45 दिवस राबविण्यात येणार असून,या कार्यक्रमाची सुरुवात आज शहरातून फेरी काढून करण्यात आली. या उपक्रमामागे वैजापूर शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना कायदेविषयक सल्ला व सहाय्य तसेच कायद्याची माहिती व्हावी हा उद्देश आहे  प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मोहियोद्दीन शेख,डी.एम.आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून सदभावना फेरी काढण्यात आली.या फेरीत जिल्हा न्यायाधीश मोहियोद्दीन शेख, जिल्हा न्यायाधीश डी.एम.आहेर,दिवाणी न्यायाधीश आर.एन.मर्क,पी.टी. शेजवळ,पी.आर.दांडेकर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीवाय.जे.तांबोळी,एस.आर.शिंदे,एस.एस.निश्चल, वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र हरिदास,उपाध्यक्ष अनिल रोठे,सचीव सईद अली, विधिज्ञआसारामरोठे,प्रमोदजगताप,पी.आर.निंबाळकर,के.बी.कदम,प्रवीण.साखरे जे.डी.हरिदास,रामकृष्ण बोडखे,सोपान पवार,किरण त्रिभुवन,राफे हसन, संजय बत्तीसे, व्ही.जी.वाघ,महेश कदम,काशिफ शेख,पी.एम.चंदने यांच्यासह विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी वर्ग एनसीसीचे कॅडर सहभागी झाले होते. कोविड नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला.