जालना जिल्ह्यातील रोषणगांव,रोहिलागड आणि जामखेड मंडळात अतिवृष्टी

Displaying IMG-20200625-WA0074.jpg

जालना : जालना जिल्ह्य़ातील  बदनापूर तालुक्यातील रोषणगांव मंडळात गुरूवारी पहाटे दोन ते साडेपाच या वेळेत  207 मि.मी. व अंबड तालुक्यातील  रोहीलागड मंडळात 115 मि.मी व जामखेड मंडळात 129 मि.मी.  पाऊस झाला आहे ही तिन्ही मंडळे जिल्ह्याच्या पश्चिमेला एकमेकांना लागून आहेत या सगळ्या परिसराला पहाटे  पुराच्या पाण्याने वेढले असून  चिकनगाव,अंतरवाला आवा ,खेडगाव,बदापूर,रोषणगांव, रोहीलागड या गावाच्या शिवारातील अनेक  बंधारे फुटले आहेत शेत जमिनी ,विहिरी पूर्ण  पाण्यात गेल्या आहेत. दुधना,सुकना आणि लहूकी या नदीच्या पात्रात मोठा पूर आला आहे. तालुक्यातील या सगळ्या गावातील रस्ते पाण्यात गेले असून अनेक गावासोबत संपर्क तुटला आहे 

Displaying IMG-20200625-WA0038.jpg
अंबड तालुक्यात अंतरवाला आवा या गावात समाजमंदीर अर्धे पाण्यात गेले आहे

बदनापूर तालुक्यातील दाभाडी 43 मि.मी.,सेलगाव 67 मि.मी. व बावनेपांगरी 34 मि.मी. ,अंबड तालुक्यात अंबड 55 मि.मी. ,धनगर पिंप्री 88 मि.मी. ,जामखेड 129, सुखापूरी 75 मि.मी. पाऊस झाला आहे. या सगळ्या परिसरात शेतातील कोठे विहीरी पडल्या आहेत अपरिमित नुकसान झाले आहे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अवधूत खडके यांनी केली आहे . यापूर्वी दिनांक 18 जुन रोजी याच परिसरात अतिवृष्टी झाली होती त्याच भागात पुन्हा गुरूवारी पहाटे तुफानी पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात सरासरी 23.30 मि.मी. पावसाची नोंद
Displaying IMG-20200625-WA0082.jpg

जालना जिल्ह्यात 25 जून रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 23.30 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे. जालना-17.38 (153.23 ), बदनापूर- 76.20 (245.60 ), भोकरदन- 6.25 (172.54), जाफ्राबाद-6.00 (163.00), परतूर- 0.00 (120.60 ), मंठा- 9.25 (155.00 ), अंबड- 70.57 (253.99) घनसावंगी- 0.71 (147.15) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 176.39 मि.मी. एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *