येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडले,नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे

पुलावरून पाणी ​वाहत ​असल्याने दिवसभर वाहतूक बंद

जिंतूर ,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-

जिंतूर पासून 15 किमी.अंतरावर असलेल्या ​ये​लदरी धरणाचे  10 दरवाजे ​उघडल्याने ​ धरणा समोरील पुलावरून पाणी वहात आहे या मुळे या पुलावरून आज दिवसभर ​वाहतूक ​ बंद रा​हि​ली​. ​ विदर्भाकडे जाणाऱ्या अकोला, रिसोड, वाशीम,या पैकी एकही बस ​धावू ​शकली नाही दिवसभर दरवाजे उघडेच होते व पाण्याचा विसर्ग सुरूच ​राहिला. ​

येलदरी धरण विसर्ग  

आज सकाळी 10.30  वाजता धरणाचे  Spillway gate क्र. 1,5,6 व 10  हे 1.5 m वाढवून  एकुण (गेट नं.1,3,5,6,8,10-3 m आणि गेट नं.2,3,4,7,8,9-2 m ) त्याद्वारे 100561.50 cusecs (2847.60 Cumecs ) विसर्ग  पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येईल.
 सद्यस्थितीत पूर्णा नदीपात्रात ( Spillway gate – 100561.50 Cusecs + Hydro power -2700 Cusecs ) असा एकुण 103261.50 Cusecs (2924.055 Cumec) विसर्ग चालू असेल