भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 87 कोटी मात्रांचा टप्पा केला पार

  • गेल्या 24 तासात 1.02 कोटी मात्रा देण्यात आल्या
  • रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.81%, मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर
  • गेल्या 24 तासात 18,795 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 201 दिवसांनंतर 20000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद.
  • उपचाराधीन रुग्णांची संख्या (2,92,206) एकूण रुग्णसंख्येच्या 0.87%
  • साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.88%) गेल्या 95 दिवसांपासून 3% पेक्षा कमी

नवी दिल्‍ली, २८ सप्टेंबर /प्रतिनिधी :-गेल्या 24 तासात 1,02,22,525 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 87 कोटी (87,07,08,636) मात्रांचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 84,62,957 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत. 

गेल्या 24 तासांत 26,030 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,29,58,002 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.81% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा रुग्ण बरे होण्याचा हा सर्वोच्च दर आहे. 

केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 93 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्ण नोंदीचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 18,795 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 201दिवसांनंतर 20000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे.देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,92,206 असून देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.87% आहे. तसेच ही रुग्णसंख्या गेल्या 192 दिवसातील निचांकी आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 13,21,780  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 56.57 (56,57,30,031) कोटींहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.88% असून गेल्या 95 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.42% असून, गेले सलग 29 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 112 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.