स्त्रीयांच्या लेखनाचा संबंध तिच्या चारित्र्याशी जोडण्यात येतो,साहित्य संमलेनात स्त्रीवादावर गहन चर्चा

May be an image of 5 people and people standing

औरंगाबाद,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- पुरूषांच्या सोयीच्या व्यवस्थेमध्ये स्त्रीयांना मोळणेपणाने लिहिता येत नाही. स्त्रीयांच्या लेखनाचा संबंध तिच्या चारित्र्याशी जोडण्यात येतो.  त्यामुळे अशा व्यवस्थेला उध्वस्त करत स्त्रीला स्वतंत्रपणे लिहिता येईल असे वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता ४१ व्या मराठवडा साहित्य संमेलनात रविवारी व्यक्त करण्यात आली.

यशवंतराव चव्हाण साहित्यनगरीतील प्र.ई. सोनकांबळे विचारमंचावर आयोजित चौथ्या परिसंवादात सहभागी झालेल्या मान्यवरांनी स्त्रीवादावर गहन चर्चा करताना मराठी लेखिका-कवयित्रींच्या लेखनासंबंधीचे अनेक पदर उलगडून दाखवले.मराठवाडा साहित्य परिषदेच्या लोकसंवाद फाउंडेशनद्वारे आयोजित संमेलनात ललिता गादगे यांच्या अध्यक्षेखाली ‘मराठी लेखिका-कवित्रींचे लेखन स्त्रीवादात अकडले आहे !’ या विषयावर परिसंवाद रंगला.

May be an image of 5 people, people sitting, people standing and indoor

या विषयावर बोलताना भगवान काळे, समिता जाधव, योगिनी सातारकर-पांडे, शिवराज गोपाळे, महेश मंगनाळे यांनी विषयांच्या दोन्ही बाजूंनी प्ररखड भाष्य केले. यावेळी काही मान्यवरांनी मराठी लेखिका व कवित्रींचे लेखन स्त्रीवादात अडकले असल्याची भावना व्यक्त केली. तर काहींनी बंडखोर लेखिका व कवित्रींचा दाखला देत लेखन स्त्रीवादात अडकल्याची गोष्ट अमान्य केली. स्त्रीयांच्या व्यथा व वेदना या स्त्रीयांच्या लेखनातून समोर येण्याची गरज काळे यांनी व्यक्त केली.  तर सविता जाधव यांनी पुरूषी मानसिकतेच्या समाजातात स्त्री मोकळेपणाने लिहू शकत नसल्याचे मत व्यक्त केले.  जगभरातील निम्मी लोकसंख्या स्त्रीयांची आहे. पण यापैकी किती टक्के स्त्रीयांना स्वत:च्या अधिकाराची जाणीव आहे? यापैकी किती टक्के स्त्रीया मुक्तपणे लिहू शकतात?, असे प्रश्न व्यवस्थेला विचारात लेखनात मुक्त संचार आवश्यकता व्यक्त केली.  योगिनी सातारकर यांनी विविध बंडखोर कवित्रींचे दाखले देत मराठी लेखिका-कवित्रींचे लेखन स्त्रीवादाच्या अडगळती पडले नसल्याचे स्पष्ट केले. तसचे स्त्री ही माणूस व व्यक्ती म्हणून व्यक्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले.