आजचा शेतकरी धोरणकर्त्या राजकारण्यांचा बळी :शेतकऱ्यांनी गरीब रहावे असेच राज्यकर्यांचे धाेरण

औरंगाबाद,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-शेतकऱ्यांना गरीब रहावे असेच राज्यकर्यांचे धोरण राहिले आहे, असा आरोप परिसंवादात सहभागी वक्त्यांनी  काढला. विशिष्ठ हेतु ठेवून कायदे बनविले जातात. त्यातुन शेतकऱ्यांचे मरणच होत आहे. ज्यांना फायदा पोहचायचा असतो. तो योग्यपणे पोहचवला जातो,असेही वक्त्यांनी  सांगितले.

May be an image of 7 people, people sitting, people standing and indoor

लोकसंवाद फाऊंडेशन आयोजित ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात संत जनाबाई व्यासपीठावर ‘आजचा शेतकरी धोरणकर्त्या राजकारण्यांचा बळी’ याविषयावर दुपारच्या सत्रात परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी शेषराव मोहिते होते. या परिसंवाद जांब समर्थ येथील राजकुमार तांडगे, उमरगा येथील बालाजी मदन इंगळे, कळंबचे केंदार काळवणे, नांदेडचे नारायण शिंदे आणि औरंगाबादचे कैलास तवार सहभागी होते.

यावेळी बोलताना काळवणे म्हणाले, बॅंका कारचे लोण घेण्यासाठी सहा टक्के व्याजदाराने कर्ज देतात, पण ट्रक्टर देण्यासाठी तोच दर १४ टक्के असतो. हे सर्व राजकीय नेत्यांच्या धोरणामुळेच होते, त्यामुळे रडणारे राजकारणी नकोत, अशी भूमिका मांडली.

May be an image of 4 people, people sitting, people standing and indoor

राजकुमार तांगडे म्हणाले, सगळीकडे गोंधळ सुरू आहे. आपण शेतकऱ्यांची पोर केवळ अंधरात दगड मारीत आहोत. शेतकऱ्यांचा हिताचा कायदा असल्याचे दिसतो, पण प्रत्यक्षात फायदा दुसऱ्याचाच असतो. त्यासाठीच कायदा केलेला असतो, हे नंतर समजते. हेच सर्वत्र सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

बालाजी मदन इंगळे म्हणाले, आतापर्यंत शेतकऱ्यांची अनेक आंदोलने झाली. या आंदोलनातुन काय मिळाले याचा शोध घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या पुढे कोणताही मार्ग दिसत नाही. त्यामुळे धोरणकर्त्या राजकारण्यांनी धोरण बदलले पाहिजे, असा अशावाद व्यक्त केला.

May be an image of 5 people, people sitting, people standing and indoor

कैलाश तवार यांनी शेतकऱ्यांना मागील ७५ वर्षात कशा पद्धतीने राज्यकर्त्यांनी लुटले आहे. याची आकडेवारीच सादर केली. हजारो भ्रष्टाचार झाले त्यावर राजकीय व्यक्ती चकार शब्द बोलत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

शेतकरी हाच एकमेव असा व्यक्ती आहे ज्याला सर्वांना लुटता येते. प्राणी सगळीकडे शेतीचा नासधुस करतात. व्यापारी भाव पाडून शेतकऱ्यांना लुटतात. राजकारणी धोरण आखून लुटतात. प्रशासन आडवणूक करून लुटतो, असे सर्वजण शेतकऱ्यांना सतत लुटत आहेत, असे प्रतिपादन नांदेड येथील शेतकरी नारायण शिंदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कायद्यांना धोरण ठरविले जाते. हे धोरण काही विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी असते. त्यातुन शेतकऱ्यांचा फायदा दाखविण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात तोटाच झालेला असतो. शेतकऱ्यांचे मरण हेच राज्यकर्त्यांचे धोरण राहिले असल्याचे अध्यक्षीय समारोपात शेषराव मोहिते यांनी सांगितले.