पैठण तालुक्यातील रस्ते, पुलांच्या कामासाठी प्राधान्याने निधी दिला जाईल -सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

May be an image of 2 people, people standing and text that says "मा.ना.श्री. अब्दुल सत्तार राज्यमंत्री महसुल, ग्रामविकास खार जमिनी विकास, सहार महाराष्ट्र राज्य मा.श्री. मा सर्त विधानर्प हाण प्रियंका पैठण"

औरंगाबाद, २६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- पैठण तालुक्यातील रस्ते, पुलांच्या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. प्राधान्याने या तालुक्यासाठी निधी दिला जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

पैठण तालुक्यातील टाके डोणगाव-विहामांडवा-तुळजापूर रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा कामाचे भूमिपूजन श्री. चव्हाण यांच्या हस्ते आज झाले. या निमित्ताने विहामांडवा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री  संदिपान भुमरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मिनाताई शेळके, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, माजी आमदार सर्वश्री डॉ. कल्याण काळे, नामदेव पवार, संजय वाघचौरे, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबादचे मुख्य अभियंता दिलीप उकीर्डे, अधीक्षक अभियंता अनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

May be an image of 12 people, people standing and indoor

श्री . चव्हाण म्हणाले की, गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी कोकणातील समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याकरीता निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. वॉटरग्रीडच्या माध्यमातून जायकवाडी धरणातून पैठण तालुक्यातील गावांना शुध्द पाणीपुरवठा केला जाईल. वारकऱ्यांच्या सोयीसाठी पैठण-पंढरपूर या पालखी मार्गाची दुरुस्ती केली जाईल. तसेच या मार्गावरील गोदावरी नदीवर पुल बांधण्यासाठी अर्थसंकल्पात 20 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. आज भूमिपूजन करण्यात आलेला डोणगाव-विहामांडवा-तुळजापूर या रस्त्याचा जास्तीत जास्त भाग सिमेंट कॉक्रींटचा तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांना  सूचना दिली जाईल, त्यासाठी अधिकचा निधी देण्यात येईल. पैठण प्राधिकरणाला अधिकचा निधी मिळून देण्यासाठीही निश्चित प्रयत्न केला जाईल, जेणेकरुन विकासाची उर्वरित कामे पूर्ण करता येतील. पैठण येथील उदयान जागतिक स्तराचे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

May be an image of 9 people, people standing and text that says ".२११ते डोणगांव- डोणगांव- रविवार दि. २६ विशेष सप्टेंबर केंद्रीय मा.ना. मा.ना.श्री. राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे उपस्थिती २०२१ रोजी सकाळी १०:३० वा. विभाग भारत सरकार विहामांडवा भूमिपूजन समारंभ खनिकर्म पैठण विशेष उपस्थिती बंदरे मा.ना.श्र अशोक शुभहस्ते अब्दुल सत्तार विकास महाराष्ट्र राज्य उपरोक्त सहाय्य मा.श्री सतीश चव्हाण विधानपरिषद, सदस्य उपस्थिती औरंगाबाद मुख्य अभियंतासा बां.प्रादेशिकविभ विनीत अधिक्षत विधानपरिषद,सद गाबाद सुंदरदास भगत अभियंता प्रियंका पैठण:"

श्री. भुमरे म्हणाले की, विहामांडवा हे बाजारपेठेचे गाव आहे, रस्त्यासाठी या गावाला मोठया प्रमाणात निधी मंजूर झाल्यामुळे या गावच्या विकासात भर पडणार आहे. येत्या काळात वॉटरग्रीडच्या माध्यमातून पैठण तालुक्यातील गावांना शुध्द पाणीपुरवठा मिळणार आहे, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. तसेच मातोश्री पाणंद रस्ते योजनेतंर्गत शेतात जाण्यासाठी दर्जेदार रस्ते निर्मिती केली जाईल. औरंगाबाद-पैठण  हा रस्ता चारपदरी करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. येत्या काळात मोसंबीच्या साठवणुकीसाठी पाचोड येथे लवकरच कोल्ड स्टोरेज सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे पैठण येथे मोसंबीचे क्लस्टर सुरु करण्यात येणार आहे. बिडकीन येथे पाचशे एकरमध्ये फुडपार्कची उभारणी करण्यात येणार आहे. पैठण तालुका अधिक सुजलाम सुफलाम करण्यासाठी  प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.  यावेळी  श्री. पटेल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक  श्री. उकीर्डे यांनी केले.