आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीला संत महंत आणि त्यांचे विचार हेच उत्तर

औरंगाबाद,२५ सप्टेंबर /प्रतिनिधी :-

डॉ.ना.गो.नांदापूरकर सभागृह मध्ये “आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर संत साहित्य हेच उत्तर…! हा परिसंवाद घेण्यात आला या परिसंवादाचे अध्यक्ष सु.ग. चव्हाण (नांदेड) हे होते. या परिसर संवादांमध्ये मोहिब कादरी ,संजय जगताप, रविंद्र बेंबरे, राम रौनेकर आणि दीपा क्षीरसागर यांनी सहभाग नोंदवला . सर्वच वाक्यांनी परिसंवादात आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीला संत महंत आणि त्यांचे विचार हेच उत्तर असू शकते असं ठणकावून सांगितलं

आज समाजात घडणाऱ्या विचित्र घटना आणि त्यांना असलेलं राजकीय पाठबळ हेच कारणीभूत आहे संत महंतांचे विचार समाजातून हद्दपार होतात की काय अशी भीती व्यक्त केली याला  जबाबदार कोण  आहेत . परिसंवादात बोलताना मोहिब कादरी म्हणाले की विश्वाचा देव एकच आहे स्त्री पुरुष समानता स्त्रीमुक्तीचे धडे संत साहित्याने दिलेला आहे विश्वबंधुत्वाचा संदेश संतांनी दिलेला आहे, जो आजच्या युगात लागू पडतो. बोलताना संजय जगताप यांनी महानुभाव पंथामध्ये अहिंसा हे तत्त्व सांगितले होते जे की आज तंतोतंत लागू पडते .यावेळी बोलताना संजय जगताप म्हणाले की महानुभाव पंथाने स्वातंत्र्य समता बंधुता याची शिकवण दिली ज्यांची समाजाला गरज आहे. तर रविंद्र बेंबरे यांनी विषयाची मांडणी करताना सांगितले की संतांनी सांगितलेले धैर्य हा गुण आज अंगीकारला पाहिजे म्हणजे संकटाला तोंड देऊ शकतो संतांचे विचार वैश्विक आहे विषमता नष्ट करण्यासाठी त्यांचे विचार अमलात आणले पाहिजे.

राम रौनेकर बोलताना म्हणाले  ,की धर्म म्हणजे स्वतःबरोबर समाजाचा विकास करणे होय अहंकार नसावा हे संतांनी सांगितले दया क्षमा शांती ही संतांनी सांगितलेले गुण स्वीकारले पाहिजे. इंद्रियांची निवृत्ती म्हणजे मोक्ष होय.
परिसंवादाच्या शेवटी दीपा क्षीरसागर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की आजच्या काळात समानता समता हवी विषमता जातीव्यवस्था व्यसनाधिनता नष्ट झाली पाहिजे ब्राह्मण्य हे कर्मावरून ठरवावे जन्मावरून नाही. खरे साधुसंत हे भगव्या वस्त्रावरून नाही तर त्यांच्या कर्मावरून ओळखावेत परमेश्वर अंतकरणात असला की माणुसकी निर्माण होते त्यासाठी तीर्थाटन करण्याची गरज नाही पैशाचा लोक आसक्ती नको पर्यावरण बचाव हा संदेश संतांनी दिलेला आहे लोकसंख्या नियंत्रणावर देखील त्यावेळी संतांनी भाष्य केले लेकुरे उदंड जाहली लक्ष्मी सोडून गेली आजच्या सद्य समाजात राजकारणात संतांचे विचार तंतोतंत अमलात आणले तर परिवर्तन नक्कीच होईल असा सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी आपले विचार मांडताना केला अध्यक्षीय समारोपात सु.ग. चव्हाण यांनी सांगितले की प्रचलित प्रश्नांची उत्तर संतसाहित्यात आहे असे मत व्यक्त केले संतांनी समाज नेभळट बनवला नसून पुरुषार्थी बनवला आहे. भ्रष्टाचार नको हा विचार संतांनी मांडला तुका म्हणे घेती देती तेही नरकात जाती आपले चित्त निर्मळ असले तर सारे काही निर्मळ दिसते असं सांगत त्यांनी अध्यक्षीय समारोप केला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष बागल यांनी केले.