वैजापूर तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली
616.4 मिलिमीटर पाऊस, नारंगी धरण 64 टक्के भरले
वैजापूर ,२४ सप्टेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात या आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाले असून,शहर व परिसरात सलग दोन-तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. गुरुवारी (ता.23) सायंकाळी शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाला.सुमारे दोन तास विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता.दोन तासात तालुक्यात सरासरी 31.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली असून, शहरालगतचे नारंगी धरण 64.01 टक्के भरले आहे.तर बोर-दहेगाव,कोल्ही,खंडाळा,बिलवणी,जरुळ व मन्याड हे प्रकल्प 100 टक्के भरले आहे.
अतिपावसाने तालुक्यातील लासुरगाव परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी सायंकाळी वैजापूर शहर व तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले.विजेच्या कडकडाटासह सुमारे दोन ते अडीच तास जोरदार पाऊस झाला. शहरातील स्टेशन रोडवरील एका वाहनाच्या शोरूमवर व रोहित्रावर वीज कोसडल्याने मोठे नुकसान झाले.
वैजापूर तालुक्यात गुरुवारी (ता.23) मंडळनिहाय झालेला सरासरी पाऊस व आतापर्यंत झालेला एकूण पाऊस पुढील प्रमाणे–
मंडळाचे नाव झालेला पाऊस एकूण
वैजापूर 64 मि.मी. 594 मि.मी.
लाडगाव 35 मि.मी. 475 मि.मी.
नागमठाण 15 मि.मी. 300 मि.मी.
महालगाव 24 मि.मी. 478 मि.मी.
लासुरगाव 41 मि.मी. 853 मि.मी.
लोणी 05 मि.मी. 605 मि.मी.
शिऊर 60 मि.मी. 734 मि.मी.
गारज 04 मि.मी. 704 मि.मी.
बोरसर 42 मि.मी. 703 मि.मी.
खंडाळा 26 मि.मी. 638 मि.मी.
एकूण—————- 316 मि.मी. 616.4 मि.मी.
आजपर्यंत झालेला एकूण पाऊस–616 .4 टक्के
यावर्षी वैजापूर तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली असून,आतापर्यंत 112 टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.