अबब … औरंगाबादेत आज 180 कोरोनाबाधित रुग्णांची भर,4 मृत्यू

जिल्ह्यात 2136 कोरोनामुक्त, 1494 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि. 23 : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2136 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1494 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 180 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 121 आणि ग्रामीण भागातील 59 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 3836 कोरोनाबाधित आढळले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. शिवाजी नगर (4), सिडको एन चार, जय भवानी नगर (1), बौद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी (4), बायजीपुरा (1), हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर (1), सिडको (1), तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी (1), उत्तम नगर (1), समर्थ नगर (1), म्हाडा कॉलनी (1), अरिफ कॉलनी (1), कोटला कॉलनी (1), उस्मानपुरा (1), एन नऊ सिडको (3), अंबिका नगर (1), पडेगाव (1), भानुदास नगर (7), न्यू नंदनवन कॉलनी (1), विष्णू नगर (1), उल्का नगरी (1), पद्मपुरा (5), क्रांती नगर (1), नागेश्वरवाडी (2), नक्षत्रवाडी (1), एन पाच सिडको (2), एन सहा, मथुरा नगर (3), गजानन नगर (6), औरंगपुरा (1), जय भवानी नगर (9), एन सहा, संभाजी कॉलनी (1), नानक नगर (1), शिवनेरी कॉलनी, गारखेडा (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (1), एन सहा सिडको (2), सेवा नगर हाऊसिंग सोसायटी (1), राज हाइट, सेव्हन हिल जवळ (1), जे सेक्टर, मुकुंदवाडी (1), भगतसिंग नगर (4), विठ्ठल नगर, मुकुंदवाडी (1), कॅनॉट प्लेस (1), न्यू विशाल नगर (1), श्री साईयोग हाऊसिंग सोसायटी (1), राजेसंभाजी कॉलनी, जाधववाडी (1), मुकुंदवाडी (2), मयूर नगर (1), आयोध्या नगर (2), बौद्धवाडा चिकलठाणा (1), चिकलठाणा हनुमान चौक (2), सुरेवाडी (1), विजय नगर (2), गारखेडा परिसर (2), रशीदपुरा (1), जय गजानन नगर (1), अन्य (1), कैलास नगर (1), एन दोन सिडको (3), जोहरीवाडा, गुलमंडी (1), राजेसंभाजी नगर (1), बन्सीलाल नगर (1), रमा नगर (1), हनुमान नगर (2), सातारा परिसर (1), मयूर नगर, हडको (2), मयूर पार्क (1), चेलिपुरा (1), हीना नगर, चिकलठाणा (1), सिडको (1), घाटी परिसर (1), सिटी चौक (1), जाधववाडी (1), कांचनवाडी (1), दीपनगर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

ग्रामीण भागातील रुग्ण

मांडकी (2), सिद्धीविनायक हाऊसिंग सोसायटीजवळ, बजाज नगर (2), राजतिलक हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (6), ओयासिस चौक, पंढरपूर (1), ग्रोथ सेंटरजवळ, बजाज नगर (1), हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (2), सारा गौरव, बजाज नगर (2), जय भवानी चौक, बजाज नगर (1), एन अकरा, सिडको महानगर दोन, वाळूज (4), पंचगंगा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (1), संजीव हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), बीएसएनएल गोदामाजवळ बजाज नगर (1), वडगाव (1), विराज हाईट, बजाज नगर (1), दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (3), भाग्योदय हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (1), करमाड (6), फत्तेह मैदान, फुलंब्री (1), विवेकानंद कॉलनी, फुलंब्री (1), कोलघर (2), गजगाव, गंगापूर (1), लासूर नाका,गंगापूर (1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1), शिवूर बंगला (2), कविटखेडा, वैजापूर (1), शिवूर (5), मधला पाडा, शिवूर, वैजापूर (1), हायटेक कॉलनी, पंढरपूर (1), खुलताबाद (1), बजाज नगर (1), शिवालय हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), सोनार गल्ली, तुर्काबाद (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 59 स्त्री व 121 पुरुष आहेत.

आतापर्यंत 2136 जण कोरोनामुक्त

मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 2136 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. एकूण 90 कोरोनाबाधित रुग्णांना आज सुटी देण्यात आलेली असून या रुग्णांमध्ये 72 रुग्ण औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत, उर्वरीत 18 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

घाटीत तीन, खासगी रुग्णालयात एका कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील वंजारगाव येथील 66 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा 22 जून रोजी दुपारी 3.30 वाजता, दुपारी 4.15 वाजता औरंगाबाद शहरातील पीर बाजारातील 86 वर्षीय पुरूष आणि 23 जून रोजी सकाळी 8.30 वाजता फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील 60 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीमध्ये 154 कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात 151 कोरोनाबाधित रुग्ण वास्तव्यास होते. तर शहरातील एका खासगी रुग्णालयात औरंगाबादेतील गोरखेडागाव येथील 66 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचा 23 जून रोजी मध्यरात्री 12.45 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 151, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 54, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 206 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *