जिजाई, प्रतिभा,वैशाली,रंजना,रोहिणी प्राणी संग्रहालय परिवारात दाखल,पाच बछड्यांचे नामकरण

खासदार सुप्रिया सुळे यांनी केले प्रशासकांचे कौतुक

औरंगाबाद,२१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील समृद्धी वाघिणीच्या पांच मादी बछड्यांचे नामकरण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते चिट्ठी काढून करण्यात आले.सदरील पांच बछड्यांचे नाव सुचविण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देऊन किमान 200 नागरिकांकडून नावे सुचविण्यात आले होते. 

Image

सोडत  नुसार खालील प्रमाणे नाव देण्यात आले 1) जिजाई (सूचक: रामदास बोराडे) 2) प्रतिभा (सूचक विठ्ठलराव देवकर)3)वैशाली (सूचक: अथर्व चाबुकस्वार)4) रंजना (सूचक; कुसुम दिवाकर)5) रोहिणी (सूचक: पूर्वा पाटील). यावेळी त्यांनी नामकरण झालेल्या बछडे  आणि वाघांची पाहणी केली.यावेळी वाघांचे केयर टेकर मोहम्मद जिया आणि एसबीआय बँक यांनी वाघ दत्तक घेतल्या बद्दल पवार यांचा सत्कार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

Image

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी  समृद्धी वाघिणीच्या बछड्यानां नाव देण्याची अतिशय गोड संधी दिल्याबद्दल  महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांचे आभार व्यक्त केले आणि पांडेय यांचे कामाचे मुक्त कंठाने कौतुक केले. ज्या पद्ध्तीने आणि गतीने पांडेय औरंगाबाद शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे आणि विकास कामे पूर्ण करत आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक करते. ते अतिशय चांगले काम करत आहे,

Image

सुप्रिया सुळे म्हणाल्या. वाघ हा माझा आवडता प्राणी असून मी दरवर्षी वाघ बघण्यास ताडोबाला जात असते. पण आज जी गोड संधी मला मिळाली ही आयुष्यात एकदाच मिळते, सुळे म्हणल्या. या कार्यक्रमाची मला सदैव आठवण राहतील आणि मला ही संधी दिल्याबद्दल मी पांडेय यांचे धन्यवाद व्यक्त करते, औरंगाबादमध्ये एका आगळ्या-वेगळ्या बारशाला हजर राहिले. महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील समृद्धी या वाघिणीच्या पाच बछड्यांचं नामकरण करण्यात आलं.

Image

म्हणाल्या.यावेळी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय,पोलीस अधीक्षक(लोहमार्ग) मोक्षदा पाटील, अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने, शहर अभियंता एस डी पानझडे, उप आयुक्त सौरभ जोशी, प्रभारी प्राणी संग्रहालय संचालक डॉ शेख शाहेद,सेवानिवृत्त संचालक डॉ बी एस नाईकवाडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ नितिसिंह चव्हाण, एसबीआय उप प्रबंधक दत्ता प्रसाद पवार आदींची उपस्थिती होती.