जागतिक स्तरावर प्रति लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी मृत्यू भारतात

नवी दिल्ली, 23 जून 2020

जागतिक आरोग्य संघटनेच्या 22 जून, 2020 रोजी प्रसिद्ध झालेल्या 154 व्या परिस्थिती अहवालानुसार भारतात प्रति लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी मृत्यूची नोंद आहे. भारतात प्रति लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण 1.00 आहे तर जागतिक सरासरी त्याच्या सहापटीपेक्षा जास्त म्हणजे 6.04 आहे. युनायटेड किंग्डममध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे कोविड-19 आजाराने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण 63.13 आहे तर स्पेन, इटली आणि अमेरिकेत हे प्रमाण अनुक्रमे 60.60, 57.19 आणि 36.30 आहे.

भारतात, सुरवातीच्या लक्षणात संक्रमित व्यक्तींचा शोध, वेळेवर चाचणी आणि सर्वेक्षण करणे, प्रभावी उपचार व्यवस्थापनासह विस्तृत प्रमाणात संपर्कित व्यक्तींचा शोध यामुळे मृत्यू दर तपासण्यात मदत झाली आहे. कमी प्रमाणावरील मृत्यूची नोंद हे कोविड -19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसह भारत सरकारच्या श्रेणीबद्ध, पूर्व-प्रभावी आणि प्रतिबंधात्मक सक्रिय दृष्टिकोनाचे फलित आहे.

रूग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत आहे. आजमितीस कोविड-19 चे 56.38% रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 2,48,189 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात कोविड-19 चे 10,994 रुग्ण बरे झाले आहेत.

सध्या 1,78,014 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

शासकीय प्रयोगशाळांची संख्या 726 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 266 पर्यंत वाढली आहे ज्यामुळे एकूण 992 प्रयोगशाळा झाल्या आहेत. वर्गवारी खालीलप्रमाणे:

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा:  553 (शासकीय: 357 + खाजगी: 196)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 361 (शासकीय: 341 + खाजगी: 20)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 78 (शासकीय: 28 + खाजगी:  50)

गेल्या 24 तासात नमुने तपासणीत 1,87,223 पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 71,37,716 नमुने तपासण्यात आले आहेत.

माहिती तंत्रज्ञानाचा सक्रिय वापर, स्थानिक सरपंचांना अधिकारप्राप्त बनवून, लोकसहभागाने कुशल आरोग्यसेवा तयार करणे आणि असुरक्षित गटांचे संरक्षण यासारख्या कोविड विरोधी सक्रिय उपाययोजनांवर ओदिशा सरकारने लक्ष केंद्रित केले आहेत. यामुळे कमी मृत्यू दरासह रोग प्रसाराचा धोका कमी झाला आहे. भुवनेश्वर महानगरपालिकेने शहरातील गंभीर आजार झालेल्या व्यक्ती आणि वृद्ध नागरिकांच्या पूर्ण देखरेखीसाठी सचेतक हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. ओदिशा सरकारने कोविड-रूग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी 1.72 लाख आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *