भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 80.85 कोटीहून अधिक

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.72%

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 30,256नवे दैनंदिन रुग्ण

देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या (3,18,181)ही आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 0.95%

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.07%)गेले 87 दिवस 3% कमी

नवी दिल्ली, २० सप्टेंबर /प्रतिनिधी :-भारताने गेल्या 24 तासात  37,78,296 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण   80कोटीचा (80,85,68,144) महत्वाचा टप्पा पार केला आहे. एकूण 79,78,302 सत्रांद्वारे  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.गेल्या 24 तासात 43,938 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,27,15,105 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.  कोरोनातून बरे होण्याचा दर  97.72%.झाला आहे.

———————————————-

कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती

  • राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 80.85 कोटी मात्रा देण्यात आल्या.
  • देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या  1% पेक्षा कमी,  सध्या  0.95%;,मार्च 2020 पासूनचा  सर्वात कमी
  • देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,18,181,ही संख्या 183 दिवसातली सर्वात कमी संख्या
  • गेल्या 24 तासात देशात  30,256 नव्या रुग्णांची नोंद
  • रुग्ण बरे होण्याचा दर 97.72%
  • गेल्या 24 तासात 43,938 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण  3,27,15,105 कोरोनामुक्त
  • साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.07%) गेले 87 दिवस 3% पेक्षा कमी
  • दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (2.57%) गेले 21 दिवस 3% पेक्षा कमी
  • आतापर्यंत 55.36 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

——————————————————

सलग  85  दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.गेल्या 24 तासात 30,256 नव्या रुग्णांची नोंद झाली.देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,18,181आहे.उपचाराधीन रुग्ण, आतापर्यंतच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.95% आहेत.

देशभरात चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 11,77,607चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 55.36कोटीहून अधिक  (55,36,21,766) चाचण्या केल्या आहेत.देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.07% असून गेले 87  दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.57%.असून गेले 21  दिवस 3% पेक्षा कमी आणि 104 दिवस  5% पेक्षा कमी आहे.