IPL 2021:ऋतुराजच्या आक्रमक खेळीसह चेन्नई सुपरकिंग 20 धावांनी विजय

दुबई:- आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्येही मुंबईची खराब सुरुवातीची जुनी सवय अजूनही कायम आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 20 रनने पराभव झाला आहे. चेन्नईने ठेवलेल्या 157 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 ओव्हरमध्ये 136/8 एवढाच स्कोअर करता आला. सौरभ तिवारीने सर्वाधिक नाबाद 50 रन केले. चेन्नईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला सुरुवातीपासूनच वारंवार धक्के लागले. चेन्नईकडून ड्वॅन ब्राव्होने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर दीपक चहरला 2 विकेट मिळाल्या. जॉश हेजलवूड आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

Image

कोरोनाच्या संकटामुळे अर्ध्यातूनच रद्द करण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीगचे (IPL 2021) 14 वे पर्व आजपासून पुन्हा सुरु झाले. पहिलीच मॅच आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघादरम्यान खेळविण्यात आली. तशी अगदी अटीतटीची झाली नसली तरी मॅच अगदी एका रोलर कोस्टर राईडप्रमाणे होती. सुरुवातीला संपूर्णपणे मुंबईच्या पारड्यात असणारी मॅच नंतर मात्र चेन्नईने खेचून नेत 20 धावांनी विजय मिळवला. या सामन्या चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने धडाकेबाज अशी नाबाद 88 धावांची खेळी खेळत चेन्नईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

नाणेफेक जिंकत फलंदाजी घेतलेल्या चेन्नईचे दिग्गज फलंदाज एका मागोमाग एक बाद होत गेले. फाफ आणि मोईन अली शून्यावर बाद झाल्यानंतर रायडूही एकही धाव न करता दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर रैना 4 आणि धोनी 3 धावा करुन बाद झाला. पण सलामीवीर ऋतुराजने नाबाद 88 धावा ठोकल्या. त्याला जाडेजाने 26 आणि ब्राव्होने 23 धावांची मदत करत मुंबईसमोर 157 धावांचे लक्ष्य ठेवले.

खराब बॅटिंगमुळे चेन्नईविरुद्ध पराभव

मुंबईला 157 धावांचे आव्हान होते. जे त्यांच्यासारख्या दिग्गज संघासाठी तितके अधिक नव्हते. पण कर्णधार रोहित आणि अष्टपैलू हार्दीक पंड्याच्या अनुपस्थितीत सर्वच फलंदाज गारद पडले. मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. सौरभ तिवारीने अर्धशतक झळकावलं असलं तरी त्याने अत्यंत धिम्यागतीने फलंदाजी केली ज्यामुळे तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर मुंबईचा संघ 20 धावांनी पराभूत झाला आहे.

Image

मराठमोळा ऋतुराज सामनावीर

चेन्नईच्या विजयात मोठा वाटा उचलणाऱ्या ऋतुराज गायकवाडला सामनावीर म्हणून गौैरवण्यात आलं. एकीकडे मुंबईच्या माऱ्यापुढे डुप्लेसी, मोईन अली सारखे दिग्ग शून्यावर बाद होत होते. त्यानंतर धोनी रैनाही 3, 4 धावा करुन तंबूत परतले असताना एकहाती खिंड लढवत ऋतुराजने 9 चौकार आणि 4 षटकार ठोकत नाबाद 88 धावा ठोकल्या. ज्यामुळे मुंबईला चेन्नई 157 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य देऊ शकली. त्याच्या या कामगिरीसाठीच त्याला सामनावीरीचा पुरस्कार देण्यात आला आहे.