भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 80 कोटींचा टप्पा

  • गेल्या 24 तासात 85 लाखांपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या
  • रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.68 %
  • गेल्या 24 तासात 30,773 नवीन रुग्णांची नोंद
  • उपचाराधीन रुग्णांची संख्या (3,32,158) एकूण रुग्णसंख्येच्या 0.99 %
  • साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.04 %) गेल्या 86 दिवसांपासून 3 % पेक्षा कमी

नवी दिल्ली, १९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात 85,42,732 लसीच्या मात्रांचे लसीकरण झाल्यामुळे, भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आता 80 कोटींचा (80,43,72,331) टप्पा पार केला आहे. हे 79,15,457 सत्रांमधील लसीकरणामुळे शक्य झाले आहे.

गेल्या 24 तासात 33,798  कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या प्रारंभापासून) वाढून  3,26,32,222 झाली आहे.परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.68 % झाला आहे.केंद्र आणि राज्य सरकार /केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 83 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 30,773 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,32,158 आहे. तो आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.99 % आहे.देशभरात चाचण्यांची क्षमता वाढविली जात आहे. गेल्या 24  तासांमध्ये एकूण 15,59,895 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 55.23 कोटींहून अधिक (55,23,40,168) चाचण्या घेतल्या आहेत.  देशभरात चाचणी क्षमता वाढविण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.04 % असून गेल्या 86 दिवसांपासून हा दर 3 % पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.97 % असून गेले सलग 20 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 103 दिवस हा दर 5 % पेक्षा कमी आहे.