PAN-Aadhaar लिंक करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढली, आता या तारखेपर्यंत सवलत

मुंबई : PAN-Aadhaar Link : भारत सरकारने पुन्हा एकदा आधार कार्डला (Aadhaar Card) पॅन कार्डशी (PAN Card) जोडण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. आता तुम्ही तुमचे पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्डशी (Aadhaar Card) 31 मार्च 2022 पर्यंत लिंक करू शकता. आयकर विभागाने शुक्रवारी नवीन अधिसूचना जारी करताना ही माहिती शेअर केली आहे.

यापूर्वी 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख होती

आतापर्यंत पॅन-आधार लिंक (PAN-Aadhaar Link) करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर होती आणि आयकर विभागाने स्पष्टपणे सांगितले होते की जे लोक वेळेवर पॅनला आधारशी लिंक करत नाहीत, त्यांना 10,000 रुपयांचा मोठा दंड भरावा लागू शकतो. मात्र, नवीन अधिसूचना जारी होताच विभागाने हा तणाव दूर केला आहे. यानुसार, 31 मार्च 2022 पर्यंत जे पॅन-आधार लिंक करणार नाहीत त्यांच्यावर दंड आकारण्याची कारवाई केली जाऊ शकते.

पॅनला आधारशी जोडण्याची प्रक्रिया

1. आपले पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी, आपण प्रथम www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटला भेट दिली पाहिजे.
2. या वेबसाईटमध्ये तुम्हाला ‘लिंक आधार’ चा पर्याय दिसेल.
3. या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
4. येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक आणि तुमची काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
5. यानंतर, ‘सबमिट’च्या बटणावर क्लिक करताच तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधारशी लिंक होईल.

पॅन-आधार लिंक नसल्यास काय होईल?

जर तुम्ही 31 मार्च 2022पर्यंत तुमच्या पॅन कार्डाशी आधार कार्ड लिंक करू शकत नसाल तर तुम्ही पुढे पॅन कार्ड वापरू शकणार नाही. तुमचे पॅन कार्ड 31 मार्च 2022 नंतर निष्क्रिय केले जाईल. यानंतर, तुम्हाला ना बँक खाते उघडता येणार आहे ना तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. तसेच, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकणार नाही. तसेच, जर पॅन कार्ड रद्द केल्यानंतर वापरण्यात आले, तर ते आयकर कायद्यांतर्गत कलम 272B चे उल्लंघन मानले जाईल. अशा परिस्थितीत पॅन धारकाला 10,000 रुपये दंड भरावा लागेल.