मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री नवाब मलिक यांच्याहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम

परभणी,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- हैदराबाद  मुक्ती संग्राम दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त राजगोपालाचारी उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वतारोहण झाले.

Image

यावेळी महापोर अनिता सोनकांबळे, खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार बाबाजाणी दुराणी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा पोलीस अधिक्षक जयंत मिना, महापालिका आयुक्त देवीदास पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Image

प्रारंभी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन  हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी पालकमंत्री यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी,  पदाधिकारी,  नागरिक, पत्रकार यांची भेट घेवून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Image

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर, निवासी उपजिल्हाधिकरी महेश वडदकर,  उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांच्यासह  पत्रकार, नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.