रक्तदान शिबीरानिमित्त मुख्यमंत्री यांनी केले लोकमत वृत्तपत्र समूहाचे अभिनंदन

मुंबई,१५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने विशेष मोहिमेंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करून ६०७०६ रक्त युनिट गोळा करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पत्र देऊन लोकमत वृत्तपत्र समूहाचे अभिनंदन करण्यात आले.

लोकमत समूहाचे आणि लोकमत मीडियाचे चेअरमन श्री. विजय दर्डा यांनी पत्र स्वीकारले. याप्रसंगी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य सर्वश्री जयंत पाटील,डॉ नितीन राऊत, छगन भुजबळ, सुभाष देसाई, धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.