मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुचना करा नक्कीच दखल घेऊ – डॉ. भागवत कराड

औरंगाबाद ,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या  कार्यालयात सोमवारी  सकाळी नऊ वाजता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते श्री ची आरती करण्यात आली.  

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुचना करा त्याची नक्कीच दखल घेऊ असे स्पष्ट प्रतिपादन डॉ. भागवत कराड यांनी केले. “माझी स्वतःची निवड संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांनी श्री गणेश महासंघाच्या अध्यक्षपदी केली होती मी गणेश महासंघाचे प्रामाणिक पणे काम केले म्हणून श्री गणरायाचे शुभाशीर्वाद मला मिळाले व माझ्या आयुष्यात मला अनेक संधी प्राप्त झाल्या. माझे कष्टाचे चीज झाले व मला केंद्रीय अर्थमंत्री पदावर कार्य करण्याची संधी मिळाली,आणि म्हणून राज्याचा, मराठवाड्याचा आणि आपल्या जिल्ह्याच्या व शहराच्या विकासा साठी निधीची कमतरता भासु दिल्या जाणार नाही या साठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा ”

श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील हे अभ्यासु व्यक्तिमत्व  असुन त्यांच्या संकल्पनेतील अनेक सुंदर योजना आहेत त्यांनी शहर विकासाचा प्रस्ताव दाखल करावा त्यावर नक्कीच विचार केला  जाईल असेही डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.
        महासंघाचे नुतन अध्यक्ष अभिषेक देशमुख आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी यांनी सुंदर नियोजन व आयोजन केले असुन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांनी गेली ५२ वर्षे सर्व धर्मियांचा सहभाग सार्वजनिक उत्सवात वाढवून राज्यात पहिला असा अभिनव उपक्रम राबविला असुन हे कार्य विस्मरणीय व अभिनंदनीय आहे असे पुढे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे वेळी श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सत्कार अध्यक्ष अभिषेक देशमुख यांनी केला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष प्रा. मनोज पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार महासंघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी व्यक्त केले.
         या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार,अध्यक्ष अभिषेक देशमुख,राजेंद्र दाते पाटील, प्रा.मनोज पाटील,अनिल पाटील मानकापे, किशोर तुळशीबागवाले,सुरेश टाक,राजेश मेहता,संदीप शेळके, हरिष शिंदे, अनिकेत पवार, जगदिश सिध्द, गजेंद्र सिध्द, मोहीत त्रिवेदी,विशाल पुंड, राजू चव्हाण, विक्की राजे पाटील,विशाल दाभाडे, सुनील चौधरी, दिनेश सुखधान, राजाराम शिंदे या सहा अनेक मान्यवर उपस्थित होते.