भारतातील एकत्रित कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 73 कोटी मात्रांचा टप्पा केला पार

देशात गेल्या 24 तासात 33,376 नव्या दैनंदिन कोविड रुग्णांची नोंद

देशातील सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या (3,91,516) एकूण रुग्णांच्या 1.18 %

नवी दिल्ली, ११ सप्टेंबर /प्रतिनिधी :- आज सकाळ 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार देशात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत गेल्या 24 तासात 65,27,175 मात्रा देण्यात आल्या असून ,त्यामुळे एकूण लसीकरणाने 73 कोटी मात्रा (73,05,89,688) देण्याचा वैशिष्ट्यपूर्ण टप्पा आता ओलांडून पार केला आहे. एकूण 74,70,363 सत्रांच्या माध्यमातून या लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. 

कोविड – 19 लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि देशभरात त्याचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.गेल्या 24 तासात 32,198 रुग्ण बरे झाल्यामुळे, महामारीच्या प्रारंभापासून आतार्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3,23,74,497 वर गेली आहे.परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.49 % झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 76 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे.गेल्या 24 तासात 33,376 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,91,516 असून आतापर्यंत एकूण बाधित रुग्णांच्या ती 1.18 % आहे.

देशभरात चाचण्या करण्याच्या क्षमतेतील वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासात 15,92,135 चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारताने आतापर्यंत 54.01 कोटींहून अधिक (54,01,96,989) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.26 % असून गेले 78 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.96 % असून गेले सलग 12 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 96 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.