श्री गणेश महासंघाच्या कार्यालयात ” श्री ” ची प्रतिष्ठापना

औरंगाबाद ,१० सप्टेंबर /प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने महासंघाच्या बालाजी धर्मशाळा शहागंज येथील कार्यालयात ” श्री ” ची प्रतिष्ठापणा आज सकाळी करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने कोणताही सजीव देखावा न करता शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत शाडू मातीच्या दोन फुटाच्या मूर्तीची स्थापना करून आरती करण्यात आली.

May be an image of 6 people, people sitting, people standing and indoor


यावेळी पोलीस आयुक्त डॉ निखिल गुप्ता, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे,गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, अनिल मकरिये, विलास औताडे, प्रकाश मुगदिया, हिशाम उस्मानी, जगन्नाथ काळे, तनसुख झंबड, पोलीस निरीक्षक अशोक गिरी,बसय्ये बंधू, नारायण कानकाटे, संतोष कावले, गजेंद्र सिद्द, राजेंद्र दानवे, विजय निकाळजे, जयेश अभंग, रामराव चव्हाण, सुभाष उदावंत, संजय वाघमारे ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.
श्री ची आरती झाल्यानंतर श्री.गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष अभिषेक देशमुख, किशोर तुळशीबागवाले, प्रा. मनोज पाटील, राजेंद्र दाते पाटील, अनिल मानकापे पाटील, सुरेश टाक, डी.एन. पाटील, संदीप शेळके,अनिकेत पवार, विशाल दाभाडे, मोहित त्रिवेदी, विशाल पुंड, विनोद साबळे, राजू पारगांवकर, रतन घोगते, चंद्रकांत जोजारे, ह्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार केला.
यावेळी सर्व गणेश भक्तांनी कोरोनाची काळजी घेऊन साध्या पद्धतीने, गर्दी न जमवता गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व मान्यवर व महासंघातर्फे करण्यात आले.