राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादची मयुरी पवार हिची महाराष्ट्र संघात निवड

औरंगाबाद ,१० सप्टेंबर /प्रतिनिधी :- भुवनेश्वर (ओडिशा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादची मयुरी पवार हिची महाराष्ट्र संघात निवड  झाली आहे. 

शेवगाव (जि. अहमदनगर) येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो खो स्पर्धेतून हे संघ महाराष्ट्र खो खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी जाहीर केले.
या संघाचे सराव शिबिर १० सप्टेंबर पासून शेवगाव येथे सुरू होईल. सदरील संघ २२ ते २६ सप्टेंबर २०२१ दरम्यान भुवनेश्वर ( ओडिशा ) येथे ४० व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेसाठी औरंगाबादची देवगिरी महाविद्यालय व पद्मावती क्रीडा मंडळातील खेळाडू मयुरी पवार हिची महाराष्ट्राच्या मुली संघात निवड करण्यात आली, मयुरी पवार हिने १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील व खेलो इंडिया ह्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले, मयुरी पवार हिला संजय मुंढे व विकास सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
मयुरी हिची महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल औरंगाबाद जिल्हा खो-खो असोसिएशन अध्यक्ष-सचिन मुळे, रमेश भंडारी,उपाध्यक्ष-डॉ.दिपक मसलेकर, प्रा.युसुफ पठाण, डी. डी. लांडगे, गंगाधर मोदाळे, रविंद्र दरंदले, गणेश बनकर, ज्ञानदेव मुळे, कैलास पटणे, दिपक सपकाळ, शेखर जाधव, योगेश मुंगीकर यांनी शुभेच्छा दिल्या

संघ पुढीलप्रमाणे

संघ : कुमार गट : सौरभ आहिर (कर्णधार), प्रथमेश पाटील (सांगली), गौरव सोमवंशी, आदित्य कुदळे, सारंग लभडे (अहमदनगर), भरतसिंग वसावे , रवी वसावे, किरण वसावे (उस्मानाबाद), वैभव मोरे, सूरज जोहरे (ठाणे), अथर्व डहाने (पुणे), धिरज भावे (मुंबई उपनगर). राखीव – विवेक ब्राहाने (पुणे), अजय कश्यप (सोलापूर), यश भोईर (ठाणे). प्रशिक्षक – सोमनाथ बनसोडे (सोलापूर), व्यवस्थापक – अजितकुमार संगवे (सोलापूर).

मुली गट : गौरी शिंदे (कर्णधार), जानव्ही पेठे, संपदा मोरे, आश्र्वीनी शिंदे (उस्मानाबाद), वृशाली भोये, कौशल्या पवार, सरिता दिवा (नाशिक), कल्याणी कंक (ठाणे), दिपाली राठोड (पुणे), अंकिता लोहार (सांगली), मयुरी पवार (औरंगाबाद), प्रिती काळे (सोलापूर), राखीव- नम्रता गाडे
(उस्मानाबाद), सोनाली पवार (नाशिक), साक्षी पाटील (सांगली), प्रशिक्षक- सचिन चव्हाण (सांगली), राजेंद्र साप्ते (पुणे), व्यवस्थापिका- संध्या लव्हाट (अहमदनगर), फीजिओथेरोपिस्ट : डॉ. किरण वाघ (अहमदनगर).