पंतप्रधानांनी मराठीत दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली , १० सप्टेंबर /प्रतिनिधी :- पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

”आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप  शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया !