जिंकण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी क्रीडा संस्कृती जोपासावी – क्रीडा मंत्री सुनील केदार

गामा आशिया चॅम्पियनशिप मिक्स मार्शल आर्ट स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी तिसरा क्रमांक पटकवल्याबद्दल क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केले खेळाडूंचे अभिनंदन

मुंबई, ७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जिंकण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी तसेच प्रगतीच्या मार्गावर चालण्याकरिता क्रीडा संस्कृती महत्त्वाची असून ती सर्वांना जोपासावी, असे खेळाडूंचे कौतुक करतांना क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी  सांगितले.

किरगिझस्तान येथे आयोजित गामा आशिया चॅम्पियनशिप मिक्स मार्शल आर्ट स्पर्धेत भारताने तिसरा क्रमांक पटकवल्या बद्दल मंत्रालयात खेळाडूंसाठी अभिनंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,यावेळी ते बोलत होते.

क्रीडा मंत्री सुनील केदार म्हणाले,  अमेरिका  या राष्ट्राने क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना विशेष व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याने जगात पदकांच्या तालिकेत अव्वल आहे.तसेच ते राष्ट्र विकसितही आहे.खेळाला महत्त्व देणारे देश विकसित आहेत. यामध्ये जपान, कोरीया यादेशांचे उदाहरण त्यांनी दिले. क्रीडा संस्कृती फक्त पदके जिंकून देते असे नाही तर प्रगतीचा मार्ग दाखवते असे त्यांनी सांगितले.

किरगिझस्तान इथे दिनांक 28 व 29 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित गामा आशिया चॅम्पियनशिप मिक्स मार्शल आर्ट स्पर्धेत भारताने अभिमानस्पद कामगिरी करुन या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकवला असून एकूण 22 पदके जिंकले आहेत. त्यामध्ये ४ सुवर्ण,७ सिल्व्हर,११ब्राँझ पदकांचा समावेश आहे.

पदके जिंकणारे खेळाडू

कुमारी अक्षता खडतरे 47.6 किलो वजनी गटात सुवर्ण पदक,  कुमारी समता सोनावणे 55.2 किलो वजनी गटात रौप्य पदक,  कुमारी सानिका पाटील 56.7 किलो वजनी गटात कास्य पदक, विष्णू वॉरियर 56.7 किलो पुरुष वजनी गटात कास्य पदक, सुमित भयान 70.3 किलो पुरुष वजनी गटात. रौप्य पदक,  साहिल दहिया 83.9 किलो पुरुष वजनी गटात,  सौ.प्रेक्षा झवेरी – भारतीय टीम मॅनेजर,  सु्सोवन घोष – असिस्टंट कोच भारत,  जितेंद्र खरे. हेड कोच भारत.याच्यांसह अंतरराष्ट्रीय जज व रेफ्री अँड्रयू कँन्डे, यांचेही श्री केदार यांनी सन्मान पत्र देवून अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.