केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) आयोजित पुणे ते राजघाट सायकल रॅलीचे राजगुरुनगरमध्ये उत्साहात स्वागत

 पुणे,५ सप्टेंबर /प्रतिनिधी :-

आजादी की अमृतमहोत्सव च्या औचित्य साठी निघालेली CISF ची सायकल रॅली आज पुण्यातील राजगुरुनगर येथे शाहिद राजगुरु यांच्या जन्मस्थानी अभिवादन करुन मार्गस्थ झाली.. या वेळी देशभक्ति पर गीत आणि नृत्य सादर करून या सायकल रॅलीस मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले..राजगुरु यांचे वंशज सत्यजित राजगुरू आणि K N त्रिपाठी  IG CISF अनिल कुमार ADG CISF आणि पदस्थ अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.. 

राजगुरुनगर मधील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.. या सायकल रॅली मध्ये राजगुरूनगर मधील सायकल ग्रुप ने पण आपला सहभाग नोंदविला..

पुणे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आजादी का अमृत महोत्सव निमित्त केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISF  आयोजित पुणे ते राजघाट सायकल रॅली ला ADG अनिल कुमार CISF यांनी हिरवा झेंडा दाखवून राजगुरुनगर येथून या रॅली ची आज सुरुवात करण्यात आली..या सायकल रॅली मध्ये एकूण 10 सायकल पट्टू सहभागी झाले असून ही रॅली 4 सप्टेंबर ला सुरुवात होऊन 2 ऑक्टोबर रोजी दिल्ली तील महात्मा गांधी यांच्या समाधी राजघाट ला पोहोचणार आहे.

​​​या वेळी मान्यवरांनी राजगुरू यांच्या स्थळ जाऊन त्यांचे दर्शन घेतले..या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते..ही सायकल रॅली क्रांतिवीर राहणाऱ्या स्थळा पासून पुढे दिल्ली पर्यंत जाणार आहे.