भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 67.72 कोटी मात्रांचा टप्पा


गेल्या 24 तासात 58 लाखाहून अधिक मात्रा

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.43 %

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 42,618 नवे दैनंदिन रुग्ण

नवी दिल्ली,४ सप्टेंबर /प्रतिनिधी :- आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत गेल्या 24 तासात 58,85,687 मात्रा देण्यात आल्यामुळे एकूण मात्रांची संख्या 67.72 कोटी (67,72,11,205) वर पोहचली आहे. एकूण 70,88,424 सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकार कोविड –19 लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि देशभरात त्याचा विस्तार करण्यासाठी वचनबद्ध आहे.गेल्या 24 तासांत 36,385 रूग्ण बरे झाल्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची (साथीच्या प्रारंभापासून) एकूण संख्या 3,21,00,001 वर गेली आहे.परिणामी, भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.43% झाला आहे.

सलग 69 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.गेल्या 24 तासात 42,618 नव्या रुग्णांची नोंद झाली.देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,05,681 असून एकूण बाधित रुग्णांच्या 1.23 % आहे.

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 17,04,97 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 52..82 कोटीहून अधिक (52,82,40,038) चाचण्या केल्या आहेत.देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.63% असून गेले 71 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.50 % असून हा दर गेले 89 दिवस 5% पेक्षा कमी आहे.