छत्रपती शाहू पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी परीक्षेत दैदिप्यमान यश

औरंगाबाद,३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) मुंबई तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षेचे निकाल नुकतेच घोषित झाले. यामध्ये कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा ९६.७९% निकाल लागला असून मागील १२ वर्षांपासूनची यशाची परंपरा कायम राखली आहे.        

या वर्षीच्या निकालामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून अंतिम वर्षातील  वैष्णवी मुंडे ९७.८९ %,  दिव्या भवर ९५.८९ %, जयेश गावंडे ९२.१६%, गुण मिळवून उत्तीर्ण झाले, व्दितीय वर्षामधील आरती धरपळे  ९१. ०० %, अश्विनी मुंगसे  ८५. ५०%, पायल राठोड ८४.३८ % तसेच प्रथम वर्षामध्ये  प्रथमेश इधाटे ८४.११%, आरती जाधव ७७.४७%, अथर्व  सकुंडे  ७५.००% गुणांनी उत्तीर्ण झाले. तसेच कॉम्प्युटर इंजिनीअरींग विभागातून अंतिम वर्षातील संदीप प्रधान ९२.४७ %, ऋषिकेश मालानी ९२.२४ %, वैष्णवी कुंभकर्ण ९१. ९४%, व्दितीय वर्षामधील वैभव नवघरे  ९१.०७%, प्राजक्ता लिपणे  ८८.५३%, हर्ष पेंशनवार  ८७.३३%, प्रथम वर्षातील स्वप्नील तांबे ८८.००%, जयश्री पारधे ८७.५%,फलके मयुरी ८६. ३८% तसेच इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागातून अंतिम वर्षातील हर्षल राजनोर ९२.५%, ऋषभ जगदाळे ८८.३९%, मृण्मयी कायगुडे  ८८.२८%,  व्दितीय वर्षामधील खुशी कुंभार   ८७.७३ %, पारितोष चौधरी ८६.९३%,वरद पाटील  ८६.१३% तर प्रथम वर्षातील ऋषिकेश काळे  ८२. ८८%, फैझ मिर्झा ८१.२५%, सिद्धांत सर्जे ७७.६३%, इलेक्ट्रॉनीक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीअरींग विभागातून अंतिम वर्षातील शंतनू उदावंत ९१.०९%, कृष्णा देवराय ८८.००%, यशजींत वर्मा ८७. ०९%, व्दितीय वर्षामधील वरद भडगावकर ९१.११%, निकिता दायगोडी ९०.३३%, सुधीर अग्निहोत्री ८६.११%, तर प्रथम वर्षातील श्रावणी म्हेतार ८१.०६%  तेजस दैठणकर ८१.३%,अभिषेक सागजकर ८१.१%  आणि मेकॅनिकल इंजिनीअरींग विभागातून अंतिम वर्षातील श्रीनिवास भूशेट्टी ९१.९५%, अनुज मांडे ९०.९२%, ओंकार जोशी ९०.९२%, चव्हाण घनःश्याम ८९. २३ % व्दितीय वर्षामधील ऋषिकेश पाटील ८५.१३%, साहिल पठाण ८२.२५%, प्राण टेहरे ८१. ८८%,  तर प्रथम वर्षातील ओंकार पिंपळे ७५.८७%, ओंकार खालापुरे ७०.०४%, अभिराज शिंदे  ७०.०४% सौरभ गावंडे ६९. ०७% यांनी अनुक्रमे प्रथम व्दितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला. तसेच अनेक विद्यार्थी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले.      

या यशाचे गमक म्हणजे योग्य नियोजन, प्रभावी शिकवणी, पारदर्शी मूल्यमापन व विध्यार्थीभिमुख उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी होय. याचाच परिणाम म्हणून कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) मुंबई तर्फे उत्कृष्ट मानांकन देऊन गौरव करण्यात आला. भविष्यात सुद्धा हीच परंपरा कायम ठेऊन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिक ज्ञान देऊन सक्षम व कौशल्यपूर्ण बनविण्याचा प्रयत्न करू असे प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे यांनी सांगितले. 
 या यशाबद्दल  छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  रणजित मुळे, सचिव  पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, प्रा. संदिप मदन, प्रा. अनिकेत सोनवणे त्याचप्रमाणे सर्व विभागप्रमुख यामध्ये प्रा. हरीश रिंगे, प्रा. विकास शहाणे, प्रा. चंद्रशेखर राहणे, प्रा. माधव नरंगले, प्रा. विजय शेळके, प्रा. गिरीश सहाणे, प्रा. सागर आव्हाळे, प्रा. धनंजय लांब, प्रा. कैलास तिडके, प्रा. भारत धनवडे तसेच सर्व  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या!!