सप्टेंबरमध्येच येणार लहान मुलांची लस-डॉ. गुलेरिया यांची माहिती

५ वर्षांवरील मुलांना मिळणार लस

नवी दिल्ली,२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- भारतातील सर्व मुलांचे लसीकरण पूर्ण करायला कमीतकमी नऊ महिन्यांचा कालावधी लागेल, तोपर्यंत शाळा बंद ठेवणे योग्य होणार नाही, असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. सप्टेंबर महिन्यात लहान मुलांसाठी कोरोनाची लस बाजारात आलेली असेल, असे ते म्हणाले.

Dr. Guleria_1  

देशाच्या अनेक भागातील शाळा सुरू करण्यात आल्या आहे, शाळा सुरू करण्याच्या निर्णयावरून विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच शिक्षणतज्ञांमध्ये दोन मतप्रवाह आहेत, त्या पृष्ठभूमीवर डॉ. गुलेरिया यांनी शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. देशातील सर्व मुलांचे लसीकरण पूर्ण करायला नऊ महिन्यांचा कालावधी लागणार आहे, त्यामुळे पुढच्या वर्षीच्या मध्यापर्यंत शाळा बंद ठेवता येणार नाही. त्यामुळे मी शाळा सुरू करण्याच्या बाजूने आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मुले शाळेत गेल्यामुळे त्यांच्या मित्रांच्या संपर्कात येणार आहे, त्याची खूप गरज आहे, असे ते म्हणाले.
 
 
शाळेतील शिक्षक तसेच अन्य कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झाले पाहिजे, अशी सूचना करत डॉ. गुलेरिया म्हणाले की, शाळा सुरू होताना वा सुटताना तसेच दुपारच्या सुटीत विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, याचीही काळजी शाळांनी घेतली पाहिजे.

क्लिनिकल ट्रायलला मंजुरी

कोरोनाच्यावाढत्या संसर्गाच्या दरम्यान, भारतातील मुलांसाठी कोरोना लसीबद्दल एक चांगली बातमी आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) हैदराबादस्थित स्वदेशी फार्मा कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडला निर्देश दिले आहे. कोविड -19 लसीच्या (Corona Vaccine) दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात काही अटींसह 5 ते 18 वर्षे वयाच्या मुलांना क्लिनिकल चाचणी मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी, DCGI ने देशात विकसित केलेल्या Zydus Cadila लस, Zycov-D च्या आणीबाणीच्या वापरास मंजुरी दिली होती, जी देशातील 12 ते 18 वयोगटातील लोकांना उपलब्ध होईल. ही पहिली कोविड -19 विरोधी लस असून या व्यतिरिक्त, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (SII) कोव्हॅक्सला 2 ते 17 वर्षांच्या मुलांवर टप्पा II आणि III च्या चाचण्यांना मंजुरी मिळाली आहे.

याशिवाय 5 ते 18 वर्षे वयाच्या मुलांमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. मुलांवर चाचणीसाठी चौथी लस मंजूर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) लसीच्या चाचणीसाठी परवानगी दिली आहे, जी विषय तज्ज्ञ समितीच्या (एसईसी) शिफारशींच्या आधारावर 10 ठिकाणी आयोजित केली जाईल. ही भारताची चौथी कोरोना लस आहे, ज्याला DCGI कडून मुलांवर चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. 

नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ सुरुच

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 6 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात देशात 47 हजार 92 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 509 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना असल्यामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वाढत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

गेल्या 24 तासात भारतात 47 हजार 92 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 509 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 35 हजार 181 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 28 लाख 57 हजार 937 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 20 लाख 28 हजार 825 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 39 हजार 529 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 89 हजार 583 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.