अल्पवयीन मेव्‍हणीवर बलात्‍कार, नराधम भाऊजीला जन्‍मठेप

औरंगाबाद,३१ ऑगस्ट /प्रतिनिधी :- अल्पवयीन मेव्‍हणीला प्रेमाच्‍या जाळ्यात ओढुन तिला पळवुन नेत तिच्‍याशी लग्न लावुन वारंवार केल्‍याप्रकरणी नराधम भाऊजीला जन्‍मठेप व विविध कलमांखाली ३० हजारांचा दंड ठोठाविण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश के.आर. चौधरी यांनी दिले. विशेष म्हणजे गुन्‍ह्यात पीडितेला जेव्‍हा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेव्‍हा ती गर्भवती होती. पीडिता व तिच्‍या आई-वडीलांच्‍या संमतीने तिचा गर्भपात करण्‍यात आला.

प्रकरणात १५ वर्षीय पीडितेच्‍या आईने फिर्याद दिली. त्‍यानूसार, २ ऑक्‍टोबर २०१९ रोजी पीडिता आरोपी सोबत पळुन गेल्यानंतर फिर्यादीने पिशोर पोलिस ठाणे गाठुन दिलेल्या तक्रारीवरुन पीडितेच्‍या मिसींगचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. प्रकरणाचा तपास सुरु असतांना पोलिसांनी आरोपी पीडितेला आरोपीच्‍या नातेवाईकाच्‍या घरातून ताब्यात घेतले होते. त्‍यावेळी पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला. घटना घडण्‍यापूर्वी सात-आठ वर्षांपूर्वी पीडितेच्‍या मोठ्या बहिणीचे लग्न आरोपीशी झाले. आरोपी हा पीडितेच्‍या घरी नेहमी येत जात होता. त्‍यातच त्‍यांची जवळीक निर्माण होऊन त्‍यांचे एकमेकावर प्रेम जडले. घडना घडण्‍यापूर्वीच्‍या दोन महिन्‍यांपूर्वी पीडितेची बहिण बाळंतपणासाठी माहेरी आली होती. त्‍यावेळी आरोपी देखील तिच्‍यासोबत आला. तो महिनाभर तेथे राहिला. दरम्यान घरी कोणी नसल्याची संधी साधत आरोपीने पीडितेवर वांरवार बलात्‍कार केला. पीडितेला दोन महिन्‍यांपासून पाळी न आल्याने ही बाब तिने आरोपीला सांगितली. आरोपीने तिला २ ऑक्‍टोबर २०१९ रोजी दुचाकीवर पळवुन नेले. त्‍यानंतर आरोपीने तिच्‍यावर वेळो वेळी बलात्‍कार केला. चाळीसगाव जवळील एका मंदीरात आरोपीने पीडितेला कुंकू लावत तिला मंगळसुत्र बांधले. आरोपी हा पीडितेला घेवून वलठाण येथील एका नातेवाईकाच्‍या घरी थांबवला होता. दरम्यान आरोपी हा वलठाण येथे असल्याची माहिती मिळाताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पोसिलांनी पीडितेच्‍या जबाबा नंतर पीडितेचे डीएनए सॅम्पल घेतले ते आरोपीशी जुळून आले. त्‍यांनतर पीडिता व पीडितेच्‍या पालकांच्‍या संमत्तीने पीडितेचा गर्भपात करण्‍यात आला.

सुनावणीवेळी विशेष सहायक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी पाच साक्षीदारांचा जाबब नोंदवले. त्‍यात पीडिता आणि न्‍यायवैद्यकिय प्रयोग शाळेचा डीएनए अहवाल महत्वाचा ठरला. सुनावनीअंती न्यायालयाने आरोपी भादंवी कलम ३७६ (२) अन्‍वये जन्‍मठेप आणि २० हजारांचा दंड, तर कलम ३६६ अन्‍वये १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. खटल्‍यात शिरसाठ यांना तेजस्‍वीनी जाधव यांनी सहाय केले. तर पैरवी म्हणुन सुनिल ढेरे, एस.एल. सातदिवे यांनी काम पाहिले.