महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा घणाघात

पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीची महाआरती

मुंबई, ३० ऑगस्ट /प्रतिनिधी :-महाविकास आघाडी सरकारला केवळ नोटांचा आणि दारु दुकानदारांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे त्यांना झोपेतून जागं करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून शंखनाद करण्यात येत आहे, असा घणाघात भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. भारतीय जनता पार्टीच्यावतीने राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी आयोजित केलेल्या शंखनाद आंदोलनात श्री. पाटील हे पुण्यात सहभागी झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यातील मंदिर उघडण्यासाठी सद्बुद्धी मिळावी, यासाठी श्री. पाटील कसबा गणपतीला साकडं घालून गणपतीची महाआरती केली.

Displaying IMG3.jpg

            या आंदोलनात पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आ. मुक्ताताई टिळक, महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे यांच्या सह पक्षाचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

            कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनजीवन सुरळीत झालं, त्यानंतरही सर्व सुरु झालं, मात्र मंदिरं सुरू झाली नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागल्याचे सांगून चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मुख्यमंत्री होण्याआधी मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्याचे आग्रही होते. पण अल्पसंख्याकांच्या मतांसाठी धर्म न मानणाऱ्या पक्षांसोबत आघाडी केल्यानंतर मंदिरं उघडण्याला माझं प्राधान्य नाही, असं ते दाखवू लागले. आता त्यांना वारकऱ्यांचे श्रद्धाळूंचे आवाज ऐकू येत नाहीत. त्यांना फक्त नोटांचे, नोटा देणाऱ्यांचे, दारु दुकानदारांचे आवाज ऐकू येतात.”

            ते पुढे म्हणाले की, “कोरोनाचे दोन्ही लाटेत सर्वांनी निर्बंधांचं कटाक्षाने पालन करुन, सरकारला सहकार्य केलं. मात्र, कोरोनाची लाट ओसरु लागल्यानंतर हे सरकार लोकांना त्यांना जगण्याचा अधिकार नाकारु लागलं. त्यामुळे व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. आताही मंदिरासंबंधीत जे छोटे छोटे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली असतानाही राज्य सरकार डोळे झाकून बसली आहे.”

            ते पुढे म्हणाले की, “हिंदू जसे मंदिरात जाऊन प्रार्थना करतात, त्याप्रमाणे मुस्लिम, ख्रिश्चन, शिख आणि जैन बांधव हे मशिद आणि चर्च, गुरुद्वारा, जैन मंदिर मध्ये जाऊन प्रार्थना करतात. या सर्वांनी प्रार्थनेसाठी मंदिरात जायचं नाही, तर मातोश्रीत जायचं का?” असा सवाल उपस्थित करत मंदिर उघडण्यासंदर्भातील आदेश तात्काळ जारी करावा, अन्यथा भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते मंदिराचे कुलूप तोडून, मंदिरे सर्व सामान्यांसाठी खुली करतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

            यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवत, मंदिरे तातडीने उघडी करावीत अशी मागणी केली.

मंदिरे बंद, बार चालू !नागरिकांची अध्यात्मिक भावना आणि श्रद्धेचा विचार करता तात्काळ मंदिरे खुले करावी यासाठी श्री गजानन महाराज मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले.मंदिरावर उदरनिर्वाह असणारे सर्वसामान्य कर्मचारी, पुजारी, लघु व्यवसायिकांची नाराजी किमान शंखनाद आंदोलनातून तरी राज्य सरकार पर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे.शासनाने तात्काळ अनुकूल निर्णय घ्यावा नसता जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

औरंगाबाद जिल्हयात 14 ठिकाणी भाजपचे शंखनाद,घंटानाद आंदोलन

औरंगाबाद ग्रामीण :-भारतीय जनता पार्टी संभाजीनगर ग्रामीण जिल्हयाच्या वतीने पैठण,फुलंब्री,संभाजीनगर तालुका,सिल्लोड,खुलताबाद,वैजापुर,कन्नड,बजाजनगर,गंगापुर,सोयगांव तालुक्यातील श्रध्दा स्थान,आसलेले प्रसिद्ध मंदिरा समोर आज भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

सरकारला, जागे करण्यासाठी भाजप ने शंखनाद आंदोलनाने भारतीय जनता पार्टी ने सुरुवात केली यावेळी शंखनाद,घंटानाद,टाळ वाजवून अंदोलन करण्यात आली
तसेच मागील दोन महिन्यापासून भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडी व भाजपाचे नेते, कार्यकर्ते वेळोवेळी,लोकशाही मार्गाने सरकारला निवेदने दिले पंरतु महावसुली सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही.
या महावसुली सरकारला ना, हिंदू, देव देवता ,ना हिंदू जनमानस यांच्याबद्दल आस्था राहीलेली नाही.
महाविकास आघाडी सरकार दारूचे बार चालू केले, डान्सबारला परवानगी दिली ,नाईट लाइफ च्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये संस्कृतीचा विध्वंस करणे,असे अनेक लोक विरोधी ,जनमानस विरोधी निर्णय घेत असते, या महाविकास आघाडी व ठाकरे सरकारला सर्व सामान्य जनते बद्दल, गोरगरीब जनतेबद्दल शेतर्‍याबद्दल व मंदिराच्या अवतीभवती चालणाऱ्या ,अगरबत्ती, बेल फुल व नारळ,विक्रितेंच्या कुटुंबाबद्दल, या सर्व जण माणसाबद्दल थेडिही आस्था नाही,तसे आसते तर त्यांनी मंदिर उघडले असते, आणि या महामारी मध्ये मानसिक रित्या ,खचलेला माणसाला मंदिरा पर्यंत पोहोचणे , देवाकडे आपले भावना व्यक्त करणे, आणि मानसिक समाधान मिळवणे हे करता आले असते परंतु, सरकार ना मंदिर उघडते ना त्यांना त्यांना परवांगी देते, यापुढे महावसुली सरकारने मंदीर उघडली नाही तर भाजपा रस्तावर चक्काजाम,जेलभरो अंदोलन करुत आसा इशारा सर्व तालुक्याच्या ठिकाणी देण्यात आला आहे.
यावेळी – औरंगाबाद तालुक्यात जिल्हाध्यक्ष विजय औताडे, तालुका अध्यक्ष श्रीराम शेळके,सभापती राधाकृष्ण पठाडे,दिनेश शेळके,सजन बागल,रवि पडोळ,आशोक शेळके
पैठण येथे जिल्हा संघटन सरचिटणीस लक्ष्मण औटे,महीला मोर्चा उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी,जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सुरज लोळगे,तालुका अध्यक्ष डाॅ. सुनिल शिंदे, जिल्हाअध्यात्मीक आघाडी अध्यक्ष समीर शुक्ल आदीच्या नेतृत्वाखाली  आंदोलन करण्यात आले.