टपाल तिकीटावर मराठवाड्याच्या केसर आंबा तिकिटाचे अनावरण उत्साहात

औरंगाबाद,३० ऑगस्ट /प्रतिनिधी :- भारतीय डाक विभागाने मराठवाडा केसर आंब्याला “मराठवाडा केसर आंबा असा भौगोलिक मानांकन (जिओग्राफिकल टॅग) भारत सरकार द्वारा मँगो ग्रोवर्स असोशिएशन औरंगाबाद यांना प्रदान केल्यामुळे यास जागतिक स्तरावर प्रसिध्दी मिळावी व टपाल तिकीट संग्रह छंद जोपासणाऱ्या व्यक्तींसाठी व नागरिकांसाठी विशेष आवरणाचे अनावरण पोस्टमास्टर जनरल व्ही.एस.जयासंकर यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

या प्रसंगी जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, एम.बी.पाटील, विजय अण्णा बोराडे, प्रवर अधिक्षक डाकघर जी.हरिप्रसाद, आर.डी.कुलकर्णी, हेमंत खडकेकर,संजय ताठे मराठवाडा आंबा उत्पादक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी व्ही.एस.जयासंकर,सुनील चव्हाण, डॉ.तुकाराम मोटे, एम.बी.पाटील, विजय अण्णा बोराडे आदींनी विचार मांडले.त्यांनी मराठवाडा केसर आंब्याचे जास्तीत जास्त क्षेत्र व निर्यात आदी बाबींवर प्रकाश टाकला. आभार श्याम नीळकंठ यांनी मानले.

          सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठवाडा आंबा उत्पादक संघाचे पदाधिकारी भारतीय डाक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी टपाल तिकीट छंद जोपासणाऱ्या व्यक्तींची उस्‍फूर्त उपस्थिती होती.