अनिल देशमुख प्रकरण:अहवाल सत्य की असत्य यावर सीबीआयने खुलासा सीबीआयने करावा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

मुंबई, २९ऑगस्ट /प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या प्रकरणात काही वर्तमानपत्रांमध्ये सीबीआयच्या प्राथमिक चौकशी अहवालाच्या बातम्या छापून आल्या आहेत. हा अहवाल सत्य की असत्य यावर आम्ही भाष्य करू शकत नाही. त्याचा खुलासा सीबीआयने करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

देशात खोट्या बातम्यांचा व्हायरससारखा फैलाव होतोय. तसेच केंद्रातील शासनकर्ते संपूर्ण माहिती देत नसल्यामुळे खऱ्या माहितीचा तपास पत्रकारांनीही करण्याची गरज आहे, असे मत देशाच्या मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केले आहे.एखाद्या व्यक्तीवर आरोप झालेत, गुन्हा दाखल झालाय. अशावेळी ही कागदपत्रे खरी व सीबीआय फायलीतली असतील तर यापेक्षा जास्त राजकीय सूडबुद्धीने कोणतीही कारवाई असू शकत नाही, असे स्पष्ट मत नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर मांडले.

भाजपशासित राज्यातही ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत असेही लोक आहेत याची आठवणही मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना करून दिली.

राजकीय लोकांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यामध्ये सर्वाधिक खटले असणारे नेते भाजपचे आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.

राज्य सरकार गुंड व पोलिसांच्या जिवावर चालते असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला असून, त्याला नवाब मलिक यांनी उत्तर दिले. ज्यांच्यावर टाडा लावला होता त्यांना मोदी मंत्री करत होते आणि आजही मोदींच्या मंत्रिमंडळात असे लोक आहेत, असेही मलिक म्हणाले.  भाजपशासित राज्यातही ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत असेही लोक आहेत याची आठवणही मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना करून दिली.