राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्पोर्टस् रन फॉर नेशन रॅली

Displaying 06.jpg

नांदेड,२९ऑगस्ट /प्रतिनिधी :- मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नांदेड तायक्वांदो असोसिएशन  व नांदेड संघटना व  नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पोर्टस् रन फॉर नेशन’ रॅली अशोकनगर येथे रविवारी झाली. या रॅलीला महापौर प्रतिनिधी विजय येवनकर यांनी हिरवी झेंडी दाखवली.

राष्ट्रीय क्रीडा  दिनाची औचित्य साधून रविवारी सकाळी शहरातील अशोकनगर येथे मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन ‘स्पोर्टस् रन फॉन नेशन’ रॅलीला महापौर प्रतिनिधी विजय येवनकर यांनी हिरवी झेंडी दाखविली.

यावेळी मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती  संगीता पाटील डक, जिल्हा क्रिडा अधिकारी राजेश्‍वर मारावार, अ‍ॅड. निलेश पावडे, आनंद जवादवार, संजय गोळेगावकर, डॉ. हंसराज वैद्य, किरण जवादवार, शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी आनंद बोबडे, गंगालाल यादव, तिरंदाजी  संघटना सचिव  वृषाली पाटील जोगदंड, तायक्वांदो संघटनेचे सचिव बालाजी पाटील जोगदंड, राजेंद्र सुगावकर, संजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर रॅली अशोकनगर येथून आनंदनगर मार्गे काढण्यात आली होती. यामध्ये तिरंदाजी , तायक्वांदो खेळाडू, विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या रॅलीच्या यशस्वीतेसाठी विक्रांत हाटकर, कंदर आचार्य, प्रकाश दुधमल, नंदकिशोर घोगरे, शिवाजी पुजरवाड, मालू कांबळे, अष्टगाता कावळे, शुभांगी देशमुख, वैष्णवी सुगावकर, शेख फहाद लालामियॉ, कृष्णा सुगावकर, शिवम जोगदंड, अतुल गोडबोले, सृष्टी जोगदंड, गोविंदा पाटील आदींनी परिश्रम घेतले.