आयएनएस त्रिकंदचा जर्मन नौदलाच्या जहाजासोबत सागरी सहकार्य सराव

मुंबई,२८ ऑगस्ट /प्रतिनिधी :-

समुद्री चाचेगिरीविरोधी कारवायांसाठी सध्या एडनच्या खाडीत तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या आयएनएस त्रिकंद जहाजाने 26 ऑगस्ट 21 रोजी जर्मन नौदलासह सागरी सहकार्य सरावात सहभाग घेतला. जर्मन नौदलाचे जहाज  एफजीएस बायर्नसोबत हा सराव आयोजित करण्यात आला होता.हेलिकॉप्टरद्वारे क्रॉस डेक लँडिंग, समुद्रावरील युद्धाभ्यास, इंधन पुनर्भरण आणि वाफ सोडणे इत्यादी सारखे  कार्यान्वयन आयएनएस त्रिकंद आणि जर्मन नौदलाच्या हेलो (लिंक्स) हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आले.  

जर्मन नौदलाबरोबरचा सागरी सराव  या क्षेत्रातील आंतर -कार्यान्वयन  आणि सागरी सुरक्षेच्या दिशेने मोठ्या प्रमाणात योगदान देईल.या प्रदेशात शांतता, स्थैर्य  आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नौदल वचनबद्ध आहे सागरी सुरक्षा आणि संरक्षणाच्या  मुद्द्यांवर भागीदार नौदलांना सहकार्य कारण्यासोबत त्यांच्यासोबत एकत्रित कार्य करण्यासाठी करण्यास सदैव तयार आहे.