पहिल्या तिमाहीत थेट परदेशी गुंतवणुकीच्या भागभांडवलात 168% ( 17.57 अब्ज डॉलर्स ) ने वाढ

27% हिस्श्यासह ‘वाहन उद्योग’ क्षेत्र अग्रस्थानी

नवी दिल्‍ली, २८ ऑगस्ट /प्रतिनिधी :-

थेट परदेशी गुंतवणुकीच्या धोरणातील सुधारणा, गुंतवणूकीसाठी सुविधा आणि व्यवसाय सुलभतेच्या आघाड्यांवर सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांमुळे देशात थेट परदेशी गुंतवणुकीत वाढ झाली आहे.

जागतिक गुंतवणूकदारांमध्ये पसंतीचे गुंतवणूक स्थान म्हणून भारतातील थेट परदेशी गुंतवणुकीला मान्यता मिळाल्याचे खालील कल दर्शवितात :

  • 2021-22 या आर्थिक वर्षाच्या  पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल, 2021 ते जून, 2021 दरम्यान भारताने एकूण 22.53 अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित केली आहे.जी 2020-21 या आर्थिक वर्षाच्या  पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 90% जास्त (11.84 अब्ज डॉलर्स ) इतकी आहे. 
  • आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत थेट परदेशी गुंतवणुकीच्या भागभांडवलामध्ये 168% वाढ ( 17.57 अब्ज डॉलर्स) नोंदविण्यात आली.  गेल्या वर्षी याच कालावधीत थेट परदेशी गुंतवणुक ( 6.56 अब्ज डॉलर्स ) इतकी होती. 
  • आर्थिक वर्ष 2021-22  पहिल्या तिमाहीत , एकूण थेट परदेशी गुंतवणुकीत  27%  हिस्श्यासह ‘वाहन उद्योग ‘ क्षेत्र अग्रस्थानी राहिले  त्यांनतर या गुंतवणुकीत  संगणक सॉफ्टवेअर आणि  हार्डवेअर (17%) आणि सेवा क्षेत्राचा (11%) समावेश आहे.
  • आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये (जून , 2021) पर्यंत प्राप्त झालेल्या एकूण थेट परदेशी गुंतवणुकीपैकी सर्वाधिक 48%गुंतवणूक कर्नाटकला प्राप्त झाली असून त्यामागोमाग महाराष्ट्र (23%) आणि दिल्ली (11%).चा क्रमांक लागतो.