भारताचा एकाच दिवसात कोविड प्रतिबंधक लसींच्या एक कोटीपेक्षा जास्त मात्रा देण्याचा नवा उच्चांक

भारतातील समग्र कोविड-19 लसीकरण मोहिमेने 62 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

गेल्या 24 तासांत देशात 46,759 नव्या कोरोना बाधितांची नोंद

देशातील कोविड सक्रीय रुग्णांची संख्या (3,59,775)एकूण रुग्णसंख्येच्या 1.10%

नवी दिल्ली,२८ ऑगस्ट /प्रतिनिधी :-

लसीकरण मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठत देशातील नागरिकांना काल कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या  एकूण 1 कोटींहून जास्त मात्रा देण्यात आल्या. देशात गेल्या 24 तासांत, लसीच्या 1,03,35,290 मात्रा देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीच्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने 62 कोटी 29 लाखाचा (62,29,89,134)  टप्पा पार केला. हे यश 67,19,042 लसीकरण सत्रांच्या आयोजनातून साध्य करण्यात आले.

संपूर्ण देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढविणे आणि  मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करणे यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

गेल्या 24 तासांत 31,374 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे (महामारीच्या सुरुवातीपासून) आतापर्यंत कोविडमधून बरे झालेल्यांची संख्या आता 3,18,52,802 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर सध्या 97.56% वर आहे. 

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांमुळे गेले सलग बासष्ठ दिवस, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे

भारतात गेल्या 24 तासांत, 46,759 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.देशातील सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या 3,59,775 इतकी आहे. ही संख्या देशाच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.10% आहे.

देशात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांच्या  क्षमतेचा विस्तार सुरु असून गेल्या 24 तासांत एकूण 17,61,110 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 51 कोटी 68 लाख (51,68,87,602) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार होत असताना, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.19 % आहे, हा दर गेले 64 दिवस 3% हून कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील आज 2.66% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आता गेले 33 दिवस 3% हून कमी आणि सलग 82 दिवस 5% हून कमी राहिला आहे.