योग हा तंदुरुस्त राहण्याचा केवळ एक मार्ग नाही तर शरीर व मन, कार्य आणि विचार तसेच मनुष्य आणि निसर्ग यांच्यात संतुलन राखण्याचे एक माध्यम आहे – अमित शाह

नवी दिल्ली, 21 जून 2020

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

अमित शाह यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की ‘योग हा तंदुरुस्त राहण्याचा केवळ एक मार्ग नाही तर शरीर आणि मन, कार्य व विचार आणि मनुष्य आणि निसर्ग यांच्यात संतुलन राखण्याचे एक माध्यम आहे’.

Image

केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले की, ‘योग ही संपूर्ण मानवतेला भारतीय संस्कृतीने प्रदान केलेली एक अनोखी भेट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे जगाने आता योगचा अवलंब केला असून त्याला जागतिक मान्यता मिळाली आहे.

नागरिकांनी योग दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन अमित शाह यांनी आपल्या संदेशात केले.

Leave a Reply

Your email address will not be published.