औरंगाबाद महानगर पालिकेच्या सरळ सेवा रिक्तपदे भरतीचा मार्ग मोकळा

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम 2021 या नियमास मान्यता

औरंगाबाद,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :-​
मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे हे औरंगाबाद शहराच्या विकासाकडे विशेष लक्ष देऊन आहेत यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.औरंगाबाद महानगरपालिकेच्या आकृतिबंध मंजुरी साठी त्यांनी विशेष लक्ष देऊन यास मान्यता दिली आहे​.मुख्यमंत्र्याच्या ​ मान्यतेनुसार नगरविकास​मंत्री ​एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद महानगरपालिकेचा आकृतिबंध मंजूर केला. 

औरंगाबाद महानगरपालिकेच्या पदांच्या सेवा प्रवेश नियमास मंजुरी नसल्याने ,आकृतिबंध मंजूर असूनही सदर पदे सरळ सेवा /पदोन्नतीने भरताना महानगर पालिकेस अडचणी येत होत्या .या साठी नगरविकास विभाग ,शासन परिपत्रक 2/7/2008 मधील कार्यपद्धती नुसार महानगरपालिकेच्या वतीने सेवा प्रवेश नियम तयार करण्यात आले आहे .त्यास औरंगाबाद महानगरपालिका सर्वसाधारण सभा ठराव क्र 1263 दि 7/1/2020 नुसार मंजुरी दिलेली आहे .त्यानुसार  प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी 15/2/2020 च्या पत्रांन्वये सदर सेवा प्रवेश नियम शासन मान्यतेसाठी सदर केले होते .सदर सेवा प्रवेश नियमास मान्यता देण्याची बाब महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन होती.यानुसार आवश्यक त्या सुधारणासह महाराष्ट्र शासनाने सदर सेवा प्रवेश नियमास मान्यता दिली आहे.   

आज  २७ ऑगस्ट रोजी मुंबई येथे  नगरविकास​मंत्री​  एकनाथ शिंदे यांनी मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे औरंगाबाद महानगरपालिकेचे सरळ सेवा भरती नियम हस्तांतरण केले.  या पूर्ण प्रक्रियेमध्ये पालकमंत्री सुभाष देसाई व पर्यावरण ​मंत्री ​आदित्य ठाकरे यांनी महत्वपुर्ण सहकार्याची मोलाची भूमिका बजावली.तसेच आमदार  अंबादास दानवे, संजय  शिरसाठ व  प्रदीप जैस्वाल यांनी सुद्धा नगरविकास मंत्री ​ यांच्या​कडे सरळ सेवा प्रवेश भरती नियमांस मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. महाराष्ट शासन यापुढेही औरंगाबाद महानगर पालिकेस सहकार्य करणार असल्याचे नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.   

आजचा दिवस हा औरंगाबाद महानगर पालिकेच्या इतिहासात एक महत्वपूर्ण दिवस असून आज  सरळ सेवा भरती प्रवेश नियमांस महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाली आहे .यामुळे महानगर पालिका औरंगाबाद यांची रिक्त पदांसाठी  सरळ सेवा प्रवेश पद भरती करण्यास मार्ग मोकळा झाला आहे.लवकरच बिंदु नामावली व ​रोस्टर ​ मंजूर करून घेण्यात येणार आहे.अशी माहिती प्रशासक तथा आयुक्त  आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.

कोरोनाची तिसरी लाट जर आली नाही तर औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने पुढील पाच ते सहा महिन्यांत नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे ही त्यांनी  सांगितले.  महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनंतर महानगर पालिकेस आता यापुढे मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही .यामुळे अधिक चांगल्या प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध करून  देण्यास महानगरपालिकेस सहकार्य मिळणार आहे .हा आकृतिबंध महानगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलवून टाकणारा ठरणार आहे आणि जे रिक्त पदे भरती केले जाणार आहेत यामूळे जे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे याद्वारे येणारे 35 ते 40 वर्षापर्यंत महानगरपालिकेच्या विकासाला दिशा देणारे ठरणार आहे असे प्रतिपादन प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी यावेळी केले.