डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांचा जीवन गौरव पुरस्काराने होणार सन्मान

औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने सन्मान

औरंगाबाद ,२६ ऑगस्ट /प्रतिनिधी :- क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे आणि मराठवाडयाच्या क्रीडा जगातला नव्या उंचीवर नेणारे डॉ. दत्त्ताभाऊ पाथ्रीकर यांना औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा कै. भानुदासराव चव्हाण सभागृह येथे होणार आहे.

केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, माजी मंत्री राजेंद्र दर्डा आणि ऑलिम्पिक संघटनेचे संस्थापक सचिन मुळे यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा सकाळी दहा वाजता पार पडणार आहे. डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांच्यासह ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती रुजवणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील एका क्रीडा शिक्षकाचा ‘आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी ऍथलेटिक्स खेळाचे प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांचा विशेष गौरव केला जाणार असल्याची माहिती आयोजक औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे पत्रकाद्वारे गुरुवारी कळवली.

Olympic Games - Wikipedia

आदर्श शिक्षक पुढील प्रमाणे:  औरंगाबाद- स्मिता डबीर(पारगावकर),  फुलंब्री- एकनाथ ढेके, वैजापूर- बाळासाहेब व्यवहारे, गंगापूर- प्रा. उदय तगारे, पैठण-निलेश गायकवाड, खुलताबाद-कुरेशी मोहम्मद अख्तर, कन्नड-प्रवीण शिंदे. याशिवाय तब्बल ८३ खेळांच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांचा देखील 

आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. ते पुढील प्रमाणे: खो-खो – उदय पांड्या, कबड्डी -दत्ता टेके, बास्केटबॉल- प्रशांत बुरांडे, रायफल शूटिंग- गीता मस्के, जिम्नॅस्टिक – प्रवीण शिंदे, योगा -छाया मिरकर, अॅथलेटिक्स – पूनम राठोड, फुटबॉल – सय्यद सलीमुद्दीन, क्रिकेट -अनंत नेरळकर, तलवारबाजी – सागर मगरे, हॉकी -संजय तोटावाद, बॅटमिंटन- ऋतुपर्ण कुलकर्णी, टेबल टेनिस -मनोज कानडोजे, जलतरण -अजय दाभाडे, ट्रायथलॉन -निखिल पवार , तायक्वांदो- चंद्रशेखर जेऊरकर, बॉक्सिंग शहर – अजय जाधव, जुडो-भीमराज राहाने, सॉफ्टबॉल- डॉ. रंजन बडवणे, बेसबॉल -मयुरी गायके, आट्यापाट्या – अनिल मोटे, नेटबॉल – रमेश प्रधान, सुपर सेवन क्रिकेट- सागर रूपवते, किक बॉक्सिंग- ऐश्वर्या जगताप, कराटे -प्रफुल दांडगे, जंपरोप -अभिजीत नरवडे , टेनिसबॉल क्रिकेट-सौरभ मिरकर, हापकिदो- मनीष धावणे, हॉलीबॉल शहर -लोकेश ठाकरे, श्र शाँग मार्शल आर्ट -प्रताप कदम, ग्रेप लिंक- अविनाश वाडे , विटी-दांडू -तानाजी ढेपले, साखळी स्पोर्ट्स -राजेंद्र ठेंगे, हँडबॉल – मुक्तार शेख, सॉफ्ट टेनिस -निलेश हारदे, शितोरीये  कराटे -आदिती दाभाडे, पिकल बॉल- करिश्मा कालिके , कॉर्फबॉल – विश्वास कड, गदायुद्ध – पंकज आडे , रब्बी -वैशाली चव्हाण, युनिक फाईट- अमृता अंभोरे, वुडबॉल -शरद पवार, फ्लोरबॉल- बाजीराव भुतेकर, रिंग टेनिस -सिद्धी कुलकर्णी, थ्रोबॉल -यशवंत कचरू पाटील, स्केटिंग -सोनाली आंबे,  सायकलिंग -पूजा आंबे, मार्बल टारगेट- सुशील अंभोरे, व्हीलचेअर फेन्सिंग -संजय भूमकर., स्क्वॅश- दीपक भारद्वाज, लंगडी  -ज्योती पार्केलू, प्यारा ओलंपिक- सौ मीरा बाशा, टेनिस व्हॉलिबॉल -प्रमोद महाजन, बॉक्सिंग ग्रामीण -लक्ष्‍मण कोळी, सायकल पोलो- कैलास जाधव, किक बॉक्सिंग- चंद्रकांत लांडे, मिनी गोल्फ- संतोष अवचार, वुशू -सुमित खरात (शहर), वुशू -शेख मुदस्सीर (ग्रामीण), फूट साल- आकिब सिद्दिकी, क्रीडा भारती- विनय राऊत, डॉजबॉल -प्रा. शिंदे नारायण देवराव, मल्लखांब- साईचंद्र वाघमारे, एरियल स्पोर्ट्स -प्रज्वल भनक, टारगेट बोल – श्रीनिवास मोतीयेळे, फ्लाइंग शटल – डॉ. रोहिदास गाडेकर, हाफ पिच क्रिकेट – डॉ. अभिजित देशमुख, पिच्यांक सिलॕट – अक्षय पाडुरंग सोनवने, सिलंबम – कुनाल आनंदराव पाटील, मोंटॅक्स बालक्रिकेट – सागर शेवाळे, हॉलीबॉल ग्रामीण-  आबासाहेब शिरसाठ,हँडबॉल (ग्रामीण)- अंबादास राठोड, सायकलिंग -अतुल जोशी, चेस – विलास राजपूत, नेट बॉल- रमेश प्रधान, आत्या पाट्या- अनिल मोरे, वेटलिफ्टिंग- वरून दीक्षित, कुंफू – शिवानंद जाकापुरे, लॉनटेनिस- गजेंद्र भोसले, रायफल शूटिंग- हेमंत मोरे

क्रीडा जगतातील आदरपूर्वक घेतले जाणारे नाव; दत्ताभाऊ पाथ्रीकर
औरंगाबादसह मराठवाडयात क्रीडा संस्कृती रुजवण्यात सिंहाचा वाट असलेले डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनीं अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून येथील खेळाडूंना आणि खेळाला चलन या दिली आहे. त्याच्या पुढाकारानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जलतरण तलाव आणि बॅडमिंटन हॉल सारख्या महाकाय सुविधा तयार करण्याचे श्रेय त्यांना जाते. याशिवाय महाविद्यालयीन स्तरावर क्रीडा संचालक हे पद निर्माण करून त्यांनी क्रीडा जगतात रोजगाराचे नवे मार्ग खुले करून दिले आहेत.