नोंदणी प्रमाणपत्रा शिवाय वाहनांना बायोडिझेल विक्री करता येणार नाही-जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आवाहन

औरंगाबाद,२४ऑगस्ट /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व इंधन विक्रेत्यांना शासन निर्णयानुसार तसेच राज्याचे बायोडिझेल (उत्पादन, साठवणूक, पुरवठा व विक्री ) धोरण -2021. नुसार बायोडिझेलची विक्री नोंदणी प्रमाणपत्राशिवाय वाहनाना थेट इंधन म्हणुन बायोडिझेलची विक्री करता येणार नाही. नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पसाहेब शिंदे यांनी केले आहे.

नोंदणीकृत्त बायोडिझेल उत्पादन साठवणुकदार पुरवठादार व विक्रेता ज्या ठिकाणी बायोडिझेलची विक्री करावयाची आहे. तेथे नोंदणी प्रमाणपत्र दर्शनीभागावार लावणे आवश्यक आहे. ग्राहकांना बी आय एस मानकांनुसार गुणवतापुर्ण बायोडिझेलची विक्री करावी लागणार आहे. शासन निर्णय क्रमांक डिझेल-2020/प्र.क्र.82/ना.पु.27.दिनांक. 11/05/2021 नुसार बायोडिझेल ऐवजी डिझेल किंवा डिझेल मिश्रित बायोडिझेल यांची थेट इंधन म्हणुन वापर होता कामा नये. बायोडिझेलच्या गैरवापरास प्रतिबंध करावयाचा आहे. कोणतेही बायोडिझेल मिश्रित संमीश्रण विक्री करता येणार नाही.

करिता सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या निदर्शनास बायोडिझेल अवैध रित्या विक्री होत असल्यास तात्काळ तालुकास्तरावरील तहसिलदार किंवा जिल्हा स्तरावर जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कळविण्यात यावे कारण अवैध बायोडिझेल विक्री होणार नाही याची दक्षता घेणे अवश्यक आहे.  बायोडिझेलची अवैध साठवणुक व विक्री करण्या-या विरुध्द जीवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 अन्वये फौजदारी कार्यवाही करण्यात येईल तसेच मालाच्या मूल्याच्या 100 टक्के पर्यत द्रव्यदंड अथवा रु.50,000/- या पैकी जे जास्त असेल त्या रक्कमेच्या दंड आकारण्यात येईल याची कृपया सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत  प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.