मुंबईत ‘ए रन फॉर फन’ – मिनी मॅरेथॉनचे आयोजन

सुवर्ण विजय वर्षानिमित्त मिनी मॅरेथॉन

मुंबई, २२ऑगस्ट /प्रतिनिधी :-

मुंबईतल्या कुलाबा येथे  ‘विजय मशालीच्या’ आगमनापूर्व कार्यक्रम  म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी आज,  ‘रन फॉर फन’ ही मिनी मॅरेथॉन आयोजित केली होती.  1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानवर भारतीय सशस्त्र दलांनी मिळवलेल्या  शानदार विजयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या उत्सवाच्या निमित्ताने दिल्लीत  ‘विजय मशाल’ प्रज्ज्वलित करण्यात आली आहे.  सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ती मुंबईत पोहोचेल.

भारतीय सशस्त्र दलांकडून वर्षभर चालणाऱ्या समारंभाविषयी  नागरिकांमध्ये सदिच्छा वृद्धिंगत करण्यासाठी  आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी  ‘रन फॉर फन’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सैनिक, त्यांचे कुटुंब आणि एनसीसी कॅडेट्ससह 400 हून अधिक जण  सहभागी झाले होते.

कुलाबा मिलिटरी स्टेशन येथे  मॅरेथॉनला झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल एसके प्रशार, एव्हीएसएम, व्हीएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र  हे होते. मिनी मॅरेथॉन सकाळी लवकर नरीमन पॉईंटपासून 10 किलोमीटरहून अधिक अंतराएवढी आयोजित करण्यात आली होती.