महिलांचा सन्मान करा आणि त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करा-उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपतींनी बेंगळुरु येथे शालेय विद्यार्थ्यांसमवेत साजरे केले रक्षाबंधन

Image

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2021

उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांनी रक्षाबंधनानिमित्त सर्वांना महिलांचा सन्मान करुन त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.

Image

बेंगळुरु येथे शासकीय दौऱ्यावर असलेल्या उपराष्ट्रपतींनी शालेय विद्यार्थ्यांसमवेत रक्षाबंधन साजरे केले. भाऊ आणि बहिणीतील आदर आणि प्रेम यांच्या विशेष बंधनाचा उत्सव आहे.

नागरिकांनी एकमेकांना भावा -बहिणींप्रमाणे वागवण्याचे आवाहन करत नायडू म्हणाले की,  यामुळे नागरिकांमध्ये बंधुता आणि सौहार्द वाढेल आणि आपले राष्ट्र मजबूत होईल.

Image

पुर्वापार असलेल्या भारतीय कुटुंब पद्धतीचे कौतुक करताना ते म्हणाले की, यातून आपल्याला ज्येष्ठांचा आदर करण्याची शिकवण मिळते आणि तरुणांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते. उपराष्ट्रपतींनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा मराठी आणि कोंकणीसह 13 भाषेतून ट्वीट केल्या.