उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

Event image

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन झालंय. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी लखनऊमधील पीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. 4 जुलैपासून कल्याण सिंह पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल होते.आयसीयूमध्ये चार दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. पण नंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली, तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचं निधन झाले.

आयसीयूमध्ये चार दिवस उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडली. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा नव्हती. 17 जुलैला अचानक श्वास घेण्यास अडचण येऊ लागल्यामुळे त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं.मात्र, आज उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Kalyan Singh Passes Away: नहीं रहे पूर्व सीएम कल्याण सिंह, लखनऊ के PGI में  89 साल की उम्र में ली आखिरी सांस, सुबह से ही कम हो रहा था ब्लड प्रेशर |

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. बऱ्याच काळापासून ते आजारी असल्यानं आणि हळूहळू अनेक अवयव निकामी होत गेल्यानं आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसंच राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपालही होते. 

Image

कल्याण सिंह प्रकृतीच्या अनेक समस्यांचा सामना करत होते. 27 जून रोजी पॅरोटेड ग्लँडमध्ये संसर्घ झाल्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. तिथे त्यांना ब्रेन स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात नेण्यात आलं. कल्याण सिंह यांची प्रकृती नाजूक असल्याचं कळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आजही दिल्लीनंतर योगी आदित्यनाथ थेट रुग्णालयात पोहोचले होते. तसंच ते सातत्याने डॉक्टरांचा संपर्कात होते.

Image
उत्तर प्रदेशातील भाजपचे हिंदूहृदय सम्राट

कल्याण सिंह यांना भाजपचे उत्तर प्रदेशातील हिंदूहृदय सम्राट म्हणून ओळखले जाते. हजारो कारसेवकांनी जेव्हा बाबरी मशिदीची इमारत पाडली तेव्हा कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मात्र, मशीद पाडल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी पदाचा राजीनामा दिला होता. सिंह यांनी 6 डिसेंबरच्या मेळाव्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सादर केले होते, त्यात असे म्हटले होते की, मशीदीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ, आमचं सरकार मशिदीची पूर्ण काळजी घेईल. तथापि, तसे होऊ शकले नाही. असे म्हटले जाते की, बाबरी विध्वंस प्रकरणात कल्याणसिंह यांची पडद्यामागे मोठी भूमिका होती आणि सर्व काही त्यांच्या संमतीने घडत होते. कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे, परंतु या प्रकरणामुळे ते भाजपच्या सक्रीय राजकारणापासून दूर फेकले गेले. भाजपच्या या ‘हिंदूहृदय सम्राटा’ने यूपीमध्ये पक्षाला मोठी ओळख मिळवून दिली होती. पुढे पक्षाने त्यांना राज्यपाल म्हणून नियुक्त केले होते.

Image

श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचे लढावय्ये नायक !

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद दोनवेळा भुषविणारे कल्याण सिंह हे देशाच्या राजकारणातील एक ‘फायरब्रॅंड’ नेते होते. प्रामुख्याने श्रीरामजन्मभूमी आंदोलन आणि कल्याण सिंह यांचे नेतृत्व हे अतुट नाते असून त्यामुळे कल्याण सिंह यांची राजकिय कारकीर्द झळाळून निघाली होती.श्रीरामजन्मभूमी आंदोलन ऐन भरात असताना कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. अयोध्येमध्ये रामभक्त एकत्रित आले असताना तत्कालीन केंद्र सरकारने त्यांच्यावर गोळीबार करण्यात यावा आणि त्यांना पांगविण्यात यावे, असे आदेश त्यांना दिले होते. मात्र, कल्याण सिंह यांनी “एकही रामभक्तावर गोळी चालविली जाणार नाही” अशी तेजस्वी भूमिका घेतली होती. त्याचप्रमाणे कारसेवकांनी बाबरी ढाचा उध्वस्त केला, त्यावेळी कल्याण सिंह मुख्यमंत्री होते. बाबरी पतनाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते. मात्र, रामभक्तांसाठी सत्ता गमवावी लागणे याचे कोणतेही दुःख नसल्याचे त्यांनी त्यानंतर वारंवार सांगितले होते. त्यांच्या निधनाने एक प्रखर देशभक्त, तेजस्वी हिंदुत्ववादी नेत्यास देशाने गमाविले आहे.

कल्याण सिंह यांचा जन्म ५ जानेवारी १९३२ रोजी झाला होता. ते १९९१ मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर १९९७-९९ या काळातही ते मुख्यमंत्री राहीले. उत्तर प्रदेशच्या राजकारणात हिंदुत्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती.  २००९ मध्ये त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. तर, २६ ऑगस्ट २०१४ मध्ये ते राजस्थानचे राज्यपाल बनले होते. १९९९ मध्ये भाजपा सोडल्यानंतर त्यांनी २००४ मध्ये पुन्हा भाजपा प्रवेश केला होता. यानंतर ते बुलंदशहर येथून भाजपाचे खासदार बनले, त्यानंतर २००९ मध्ये अपक्ष खासदार देखील बनले होते. २०१० मध्ये कल्याण सिंह यांनी आपली स्वतंत्र जन क्रांती पार्टी तयार केली. 

”कल्याण सिंह यांच्या निधानाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला जाईल. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी नरोरो येथे गंगा नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तसेच, २३ ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी असेल.” असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.

कल्याण सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले की, ”लोकांच्या हृदयात वसणारे प्रखर राष्ट्रवादी आदरणीय कल्याण सिंहजी यांच्यासारखे महान व्यक्तित्त्व शोधूनही सापडणार नाही. बाबूजींनी विविध संवैधानिक पदे भूषवित शेतकरी, गरीब आणि वंचित वर्गाला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडून देशाच्या प्रगतीमध्ये आपले अनुपम योगदान दिले.”