जनआशीर्वाद यात्रेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद:-डॉ.भागवत कराड

औरंगाबाद ,२१ ऑगस्ट /प्रतिनिधी :-

केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दि. १६ पासून जनआशीर्वाद यात्रेला प्रारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळात नव्याने संधी देण्यात आलेल्या मंत्र्यांना विभागानुसार जनआशीर्वाद यात्रा काढण्याचे आदेश भारतीय जनता पक्षाने दिले होते. त्याला अनुसरून मराठवाडा विभागातील नवनिर्वाचित केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांनी बीड येथून यात्रेला सुरुवात केली. शनिवारी संभाजीनगर शहरात नागरिकांनी यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद दिला असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी केले.

जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीमंडळात फेरबदल करत, अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्री मंडळात संधी दिली. त्यानुसार ७० वर्षानंतर औरंगाबाद शहराला डॉ भागवत कराड यांच्या रूपाने केंद्रीय मंत्री पद मिळाले. जुलै महिन्यापासून ते दि १५ दरम्यान, सर्व मंत्र्यांना दिल्लीतच थांबण्याचे सांगितले होते. त्याच दरम्यान, जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा नागरिकांना समजवून सांगण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांना त्यांच्या विभागात जनआशीर्वाद यात्रा काढण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड यांनी मराठवाडा विभागात दि. १६ रोजी बीड येथील भगवानगडावरून जनआशीर्वाद यात्रेला प्रारंभ केला. त्यानंतर यात्रा नांदेड, हिंगोली, जालना आणि शुक्रवारी औरंगाबाद शहरात दाखल झाली.

दरम्यान, शनिवारी यात्रेला श्रीराम चौक काल्डा कॉर्नर येथुन यात्रेला सुरुवात झाली. क्रांतीचौक मंडळातर्फे केंद्रीय अर्थराज्य मंत्री यांची साखरतुला करण्यात आली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने भव्य हार घालत यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर यात्रा शहनुर्मिया दर्गा येथे जाऊन त्यांनी अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने स्वागत स्वीकारले, त्यानंतर यात्रेच्या सूतगिरणी चौक, देवळाई चौक, नायरा पेट्रोल पम्प, शहराचे आराध्य दैवत श्री क्षेत्र खंडोबा सातारा परिसर येथे पायरीवर माथा टेकवून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, नगरनाका येथील शाहिद स्मारक येथे मंत्री मोहदयांनी पुष्पचक्र अर्पण करून शाहिदांना अभिवादन केले. यावेळी माजी सैनिकांच्या वतीने क्रेनच्या साहाय्याने हार घालून स्वागत करण्यात आले. त्यांनी भारत मातेचा जयघोष करीत परिसर दणाणून सोडले. त्यानंतर यात्रा पडेगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पणकरून जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या.

याचदरम्यान माध्यमांशी संवाद साधत, मंत्री झाल्यावर प्रथमच शहरात आल्यानंतर, नागरिकांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान भरभरून आशीर्वाद देत, जल्लोषपूर्ण वातावरणात शहर तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी भुतोना भविष्यती असा सत्कार केला. या सत्काराने मन भारावून गेले असल्याचे मंत्री डॉ कराड यांनी सांगितले. तसेच यासर्व गोष्टींची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर यात्रा खुलताबाद येथे पोहचून अर्थराज्य मंत्री डॉ कराड यांनी भद्रा मोरोतीचे बाहेरून दर्शन घेतले. दरम्यान, यात्राने खुलताबाद येथून वेरुळकडे मार्गक्रमण केले. वेरूळ येथे बाहेरून घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर मालोजीराजे भोसले यांच्या गडीवर जात अभिवादन केले. याच दरम्यान, ग्रामीण भागात ठिकठिकाणी वेगवेगळ्या माध्यमाने अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड यांचे स्वागत केले.

दरम्यान, खुलताबाद येथून विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे जनआशीर्वाद यात्रेत सामील झाले. त्यानंतर वेरूळ येथून रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे हे देखील सामील झाले. त्यानंतर यात्रा नियोजित वेळापत्रकानुसार मार्गक्रमित झाली.

यावेळी जनआशीर्वाद यात्रेच्या रथामध्ये आ. अतुल सावे, आ.प्रशांत बंब, यात्रा सहसंयोजक बालहक्क आयोगाचे माजी अध्यक्ष प्रवीण घुगे, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे, राजेश मेहता, राजु शिंदे,समिर राजुरकर,शिवाजी दांडगे, प्रा.डॉ.राम बुधवंत, सविता कुलकर्णी, लक्ष्मण औटे, व्यंकटेश कमळू, अजय शिंदे, प्रवीण कुलकर्णी, चंद्रकांत हिवराळे,दिपक ढाकणे, हाफीज शेख, हाजी दौलत खान पठाण,मुकुंद लाडकेकर, महेश माळवदकर, योगेश वाणी, साधना सुरडकर, सागर नीलकंठ, संतोष उदावंत,प्रदिप पाटील,यांची उपस्थिती होती.