देशात कोविड-19 मधून बरे झालेल्यांची संख्या 2,13,830 वर पोहोचली

नवी दिल्ली, 20 जून 2020

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 9,120 रुग्ण बरे झाल्यामुळे आत्तापर्यंत एकूण 2,13,830 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 54.13% पर्यंत पोहोचला आहे.

सध्या संक्रमित रुग्णांची संख्या 1,68,269 असून ते सर्व सक्रिय वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

शासकीय प्रयोगशाळांची संख्या 715 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 259 पर्यंत वाढली आहे (एकूण 974 प्रयोगशाळा). वर्गवारी खालीलप्रमाणे:

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 543 (शासकीय: 350 + खाजगी: 193)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 356 (शासकीय: 338 + खाजगी: 18)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 75 (शासकीय: 27 + खाजगी: 48)

गेल्या 24 तासात 1,89,869 नमुने तपासण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत 66,16,496 नमुने तपासण्यात आले.

इतर अपडेट्स:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *