मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्पसंबंधात नागरिकांशी साधला संवाद

औरंगाबाद,१८ऑगस्ट /प्रतिनिधी :- पर्यावरण संवर्धन, सामाजिक परिणाम, भू संपादन प्रक्रिया, रेल्वेचा थांबा, मिळणारा मावेजा आदी विषयांवर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे (एमएनएचएसआर) प्रकल्पाच्या पर्यावरण आणि सामाजिक परिणामाच्या मुल्यांकणासाठी रेल्वे अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि नागरिकांत आज चर्चा झाली.

May be an image of 3 people, people sitting and indoor

एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या पर्यावरण आणि सामाजिक परिणामाच्या मुल्यांकणासाठी सल्लामसलत झाली. यावेळी रेल्वेचे सह सरव्यवस्थापक अनिल शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी श्री. मोरे, प्राजक्ता कुलकर्णी, प्रदीप बर्गे, विशाल श्रीवास्तव, राहुल रंजन आदींची उपस्थिती होती.

May be an image of 1 person, sitting and indoor

नॅशनल हाय स्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडच्यावतीने मुंबई नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पर्यावरण, सामाजिक परिणामासह नागरिक, शेतकऱ्यांचे विचार श्री. शर्मा आणि अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांनी समजून घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी आनंद बोरकर, विश्वनाथ कदम, करमाडचे सरपंच कैलास उकर्डे, टाकळीचे शिवाजी चंदेल आदींनी विविध उपाय सांगत सूचना केल्या.