केंद्र सरकारमुळे मराठवाड्यातील पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे प्रतिपादन

Displaying PHOTO 2.jpg

हिंगोली ,१८ऑगस्ट /प्रतिनिधी :- केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे मराठवाड्यातील महामार्ग, रेल्वे व अन्य पायाभूत सोयी-सुविधांचा झपाट्याने विकास झाला, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बुधवारी हिंगोली येथे पत्रकार परिषदेत केले.

Displaying PHOTO 1.jpg

          यावेळी आ. तानाजी मुटकुळे, यात्रा संयोजक मनोज पांगारकर, सह-संयोजक प्रविण घुगे, माजी आमदार गजानन घुगे, गणेश हाके आदी उपस्थित होते.

Displaying PHOTO 4.jpg

          डॉ. कराड म्हणाले की, गेल्या सात वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांमुळे मराठवाड्यातील सर्व समाजाचा विकास होत असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील पायाभूत सोयी – सुविधांच्या विकासाची गती वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांसह शेतकरी बांधव ही समाधानी आहे.

Displaying PHOTO 5.jpg

केंद्रिय राज्य अर्थ मंत्री डॉ.भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात निघालेल्या जनआशिर्वाद यात्रेला सर्वत्र उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असुन सर्वसामान्य माणुस आणि शेतकरी केंद्र सरकार तथा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर कमालीचा खुष असल्याचे चित्र यात्रेदरम्यान सर्वत्र दिसत आहे. स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याला केंद्रात प्रथमच अर्थकारणाचं मजबुत पद मिळाल्याचा आनंद लोकांना होत आहे. दरम्यान मी मराठवाड्याचा सुपुत्र असुन प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपर्‍याची व भौतिक विकास प्रश्नाची मला जाण आहे. आगामी काळात काम करताना सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेवुन राज्य सरकारकडुन ज्या विकास प्रश्नाचे प्रस्ताव माझ्याकडे येतील त्यासाठी मी निधी कमी पडु देणार नाही अशा प्रकारची ग्वाही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे काम केलेलं असुन जनतेची सेवा कशी करावी?हे धडे त्यांच्याकडुन मिळालेले असल्याचे त्यांनी सांगितले.आता मिळालेल्या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून समाजातील शेतकरी बांधव, वंचित, दुर्बल बांधवांच्या कल्याणासाठी अधिकाधिक कार्य  करणार असल्याचेही डॉ. भागवत कराड सांगितले.

परळी येथे स्व.गोपीनाथराव मुंडे समाधीस्थळ अर्थात गोपीनाथ गडावरून यात्रेचा प्रारंभ झाला. गंगाखेड, पालम, लोहा, नांदेड, अर्धापुर, कळमनुरी, हिंगोली, ग्रामीण भागासह शहरात ठिकठिकाणी जोरदार यात्रेचं स्वागत झालं. केंद्र सरकारच्या कारभारावर अर्थात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या सात वर्षात ज्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र सरकारच्या योजना हाती घेतल्या आणि कोरोनासारख्या संकटात प्रभावी काम करत सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याचे रक्षण केलं. या पार्श्वभुमीवर नव्याने झालेले मंत्री जेव्हा मराठवाड्यात आले तेव्हा जनआशिर्वाद यात्रा अर्थात मंत्री झालो तरी सर्वसामान्य जनतेचा आशिर्वाद घेवुन कामाला सुरूवात करा असा संदेश भाजपाने देवु केल्यामुळे यात्रेला प्रचंड प्रतिसाद आणि सामान्य जनतेमध्ये असलेला उत्साह फार मोठी जमेची बाजु दिसुन आली. हिंगोली येथे पत्रकार परिषदेत बोलताना डॉ.कराड यांनी अनेक प्रश्नाला बिनधास्त उत्तरे दिली. मी मराठवाड्याचा सुपुत्र आहे. तीस वर्षापासुन औरंगाबाद कर्मभुमी आहे. दोन वेळा महापौर आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचा अध्यक्ष शिवाय पक्षाच्या अनेक संघटनात्मक पदावर काम केल्यामुळे मराठवाड्याच्या जिल्हानिहाय कानाकोपर्‍याची मला माहिती आहे.

मराठवाडा दुर्गम आणि मागासलेला आहे. मात्र मागच्या सात वर्षात केंद्र सरकार तथा आमचे नेते नितीन गडकरी यांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर जवळपास 15 राष्ट्रीय महामार्ग मराठवाड्यातुन गेलेले आहेत.रेल्वेच्या प्रश्नावर केंद्र सरकारने कोट्यावधी रूपायाचा निधी मराठवाड्यात दिलेला असुन आमच्या नेत्या पंकजाताई आणि खा.डॉ.प्रितमताई यांच्या पुढाकारातुन बीड-परळी-नगर रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला. उर्वरीत कामाला निधी कमी पडु देणार नाही. यात्रेदरम्यान मला शेतकरी मोठ्या प्रमाणावर भेटत असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा निधी यावर त्यांचं समाधान मोठं असल्याचे त्यांनी सांगितले.

पालम येथे एका शेतकर्‍याने पंतप्रधानाला फेटा भेट दिल्याचेही ते म्हणाले. अनेक ठिकाणी व्यापारी आणि त्यांचे जीएसटीचे काही प्रश्न समजुन घेतले असुन यात्रेला आशिर्वाद देण्यासाठी सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणावर पुढे आल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात राज्यातील आघाडी सरकारच्या विकासाचे काहीच प्रश्न दिसत नसुन ज्या योजना दिसतात त्या केवळ केंद्र सरकारच्याच असा टोला त्यांनी मारला. आगामी काळात मिळालेल्या संधीचं सोनं मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या नेत्या पंकजाताई, खा.डॉ.प्रितमताई यांनी आमचं परळीत जोरदार स्वागत केलं असल्याचेही त्यांनी सांगितले.