अपघातग्रस्तांची खा.चिखलीकरांनी घेतली भेट

नांदेड,१८ ऑगस्ट /प्रतिनिधी :- कंधार शहरातील महाराणा प्रताप चौकात भरधाव वेगात असलेला मालवाहु आयशर टेंम्पो दुकानात घुसल्याची घटना  आठवडी बाजारच्या दिवशी सोमवारी सायंकाळी घडली होती. या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची नांदेडचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बुधवार दि.१८ रोजी शासकीय रुग्णालयात जाऊन अस्थेवाईकपने चौकशी करत त्यांना धीर दिला.

Displaying WhatsApp Image 2021-08-18 at 6.32.46 PM.jpeg

यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, भाजपाचे युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर,जफ्ङ्गरोद्दीन बाहोद्दिन, भाजपाचे प्रवक्ते प्रल्हाद उमाटे, शेख असिफ, जफरुल्ल खान आदींची  उपस्थिती होती.
 कंधार येथील महाराणा प्रताप चौकात असलेल्या दुकानात सोमवार दिनांक १६ रोजी टेम्पो घुसला होता. या घटनेत कंधार शहरातील विजयगड येथील गोविंद सटवाजी भंगारे (६५र्)ें व मथुराबाई गोविंद भंगारे (६०) या वयोवृध्दाचा अपघातात मृत्यू झाला होता . तर याच अपघातात १४ जन जखमी झाले. जखमींवर  कंधारच्या ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले .

जखमींवर नांदेडच्या शासकीय वैद्यकिय रुग्णालयात उपचार चालू असून जखमी रुग्णांची बुधवार दि.१८ ऑगस्ट रोजी भेट घेत त्यांना धीर देत घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे.काही गरज भासली तर मला तात्काळ संपर्क साधा मी मदतीसाठी सर्वोतोपरी तयार असल्याचे अश्‍वासन रुग्णांच्या नातेवाईकांना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिला.  खा.चिखलीकरांनी रुग्णालय प्रशासनास अपघातातील जखमींसह अन्य रुग्णांना औषधांची कमतरता भासू देऊ नका अशा सुचना दिल्या.