देवगिरी सायक्लिंग क्ल्बने 75 कि.मी. सायकल राईड करुन केला स्वातंत्र्यदिन साजरा

औरंगाबाद,१८ ऑगस्ट /प्रतिनिधी :- देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील सायक्लिंग क्लबच्या वतीने 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त्‍ 75 कि.मी. ची सायकल राईडचे यशस्वी आयोजन केले होते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिउरकर यांच्या प्रेरणेने विविध क्लबची स्थापना करण्यात आली असून देवगिरी सायक्लिंग क्ल्ब हा त्यापैकी एक आहे. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त्‍ आयोजित करण्यात आलेल्या देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय ते वेरुळ व परत वेरुळ ते देवगिरी महाविद्यालय अशी 75 कि.मी. सायकल राईड करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

या सायकल राईडमध्ये प्रा. चागदेव माने, प्रा. दिपक मगर, संजय कवुटकर, ऋतुराज तांदळे, सौरभ कर्डीले, शेख फुरखान इ. प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.देवगिरी सायक्लिंग क्लबने यापुर्वीही काश्मीर ते कन्याकुमारी, औरंगाबाद ते भुतान अशा अनेक सायकल मोहीमा यशस्वीपणे पुर्ण केलेल्या आहेत. महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिउरकर हे देखील उत्कृष्ट् सायक्लिस्ट् आहेत व त्यांच्या प्रेरणेने सायक्लिंग क्लबची पुढील वाटचाल सुरु राहील.

या उपक्रमाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाशदादा सोळंके, सचिव आ.सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कार्यकारीणी सदस्य विवेक भोसले, स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य विश्वास येळीकर, महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिउरकर, विभागप्रमुख डॉ. सत्यवान धोंडगे, डॉ. गंजेंद्र गंधे, डॉ. राजेश औटी, प्रा. प्रकाश तौर, प्रा. संजय कल्याणकर, प्रा. रुपेश रेब्बा, प्रा. अमर माळी, श्री. अच्युत भोसले यांनी अभिनंदन केले.