इनरव्हील क्लबकडून औरंगाबाद रेल्वे स्थानक येथे दिव्यांगांसाठी व्हील चेअर वाटप

औरंगाबाद,१८ ऑगस्ट /प्रतिनिधी :- रेल्वे स्थानके, बस स्थानके, सरकारी कार्यालये, पर्यटन स्थळे व सार्वजनिक जागा या सर्व ठिकाणी जेष्ठ आणि दिव्यांगांच्या दृष्टीने  व्हील चेअर  असणे गरजेचे आहे. मात्र या सर्वच सुविधांचा वानवा रेल्वे स्थानकांसह शहरातील सार्वजनिक ठिकाणी पाहायला मिळते, याची दखल घेऊन इनरव्हील क्लब, औरंगाबाद यांच्या वतीने औरंगाबाद रेल्वे स्थानक येथील दिव्यांग प्रवाशांसाठी व्हील चेअरचे वाटप इनरव्हील क्लब, औरंगाबाद  अध्यक्ष लता मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी औरंगाबाद रेल्वे स्थानक व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, वाणिज्य निरीक्षक राजू राय, कार्यालय अधीक्षक नीलिमा ठाकरे , इनरव्हील क्लब, औरंगाबाद उपाध्यक्ष छाया भोयर, सचिव वर्षा पटेल, शिवानी लड्डा, अंजली सावे, अंजली दाशरथी, माजी जिल्हाध्यक्ष ऊषा धामणे, रेखा केदारे, वृशाली उपाध्ये, आशा भांड, माजी अध्यक्ष शीला कुलकर्णी, हिरा पेरे पाटील, अलका मेहता, चित्रा मालखरे, विजया नानकर, मंगल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.